शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

देशप्रेमापुढे तिने मातृप्रेम आणि पुत्रप्रेम आटवले : जिल्हा रुग्णालयातील अधिपरिचरिका सुनीता वक्तेची करूण कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 3:57 PM

एकीकडे आठ वर्षाचा मुलगा आजारी... दुसरीकडे आई आजारी... ती करत होती कोरोनाच्या रुग्णांची सेवा... देश प्रेमापुढे तिने मातृप्रेम आणि पुत्रप्रेम आटवले होते...

ठळक मुद्देआधुनिक हिरकणी, आई गमावल्यानंतरही म्हणतेय, ‘कोरोनाग्रस्तांची सेवा करेलच’वडिलांनाही आरोग्य सेवेचा वारसाकोरोनाचा नायनाट होईल हीच खरी श्रद्धांजली

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : एकीकडे आठ वर्षाचा मुलगा आजारी... दुसरीकडे आई आजारी... ती करत होती कोरोनाच्या रुग्णांची सेवा... देश प्रेमापुढे तिने मातृप्रेम आणि पुत्रप्रेम आटवले होते... अन् अचानक १३ रोजी आई सोडून गेली तरी ती म्हणते मी कोरोनाच्या रुग्णांची सेवा करेल हीच खरी माझ्या आईला श्रद्धांजली ठरेल! ही करुण कहाणी आहे अमळनेरचे सासर असलेली जळगाव जिल्हा रुग्णालयात अधिपरिचरिका असलेली सुनीता वक्ते (साळी) या हिरकणीची!सुनीता संदीप साळी ही अमळनेर पैलाड येथील रहिवासी माहेरचे आडनाव वक्ते असल्याने सुनीता वक्ते नावाने जिल्हा रुग्णालयात डोळ्यांच्या विभागात काम करत असताना कोरोनाचा संसर्ग वाढला. जळगावात कोरोनाचा रुग्ण आढळला आणि डोळ्यांचा विभाग खाली करून कोरोना विभाग म्हणून करण्यात आला. साहजिक अधिपरिचरिका म्हणून सुनीताची जबाबदारी वाढली होती. संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट घोंघावत आहे म्हणून कोरोनाच्या रुग्णांची सेवा हीच देशसेवा देशप्रेम मानून ती सेवा करू लागली. त्यामुळे घरी गेल्यानंतरसुद्धा तिला स्वतंत्र खोलीत क्वॉरंटाईन रहावे लागत होते. पती, मुलगा यांना भेटण्याची इच्छा असूनही तिला पुत्रप्रेमाला पोरके व्हावे लागले. अशातच मुलाला गाल सुजण्याचा आजार झाला. त्याला टॉन्सिलचा त्रास होत होता. मुलाला आईच्या भेटीची गरज होती. तिच्या मायेचा डोक्यावरून हात फिरावा असे वाटत असताना तो रडत होता. मात्र इकडे देश संकटात आहे म्हणून कोरोना हटवण्यासाठी तिने अश्रू डोळ्यातच आटवले. पतीला मुलाची जबाबदारी देऊन ती आपल्या कर्तव्यावर नियमित जात होती. हिरकणीने आपल्या पुत्रप्रेमापोटी राज्याचे नियम तोडले होते. पण आधुनिक हिरकणीने रुग्ण सेवा महत्वाची मानली, पण एवढे दु:ख कमी की काय म्हणून मलकापूरहून आई सुमनबाईचा निरोप आला की मी आजारी आहे मला भेटायला ये. सुनीताचे वडील वारलेले. भाऊ नाही, त्या सात बहिणी. मात्र आरोग्य विभागात असल्याने आईची जबाबदारी साहजिकच सुनीतावर होती. पण पुन्हा कोरोना डोळ्यासमोर आला अन् तिने काळजावर दगड ठेवला. ती आपले कर्तव्य करत राहिली. आईची तब्येत पुन्हा बिघडली होती. तिला ब्रेन हॅमरेज झाला होता. स्थानिक डॉक्टरांनी रिपोर्टशिवाय उपचार करायला नाही म्हटले. सुनीताला काय करावे सुचत नव्हते. अखेर रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात जळगावला आणण्यात आले. मात्र आईला एका वॉर्डात टाकण्यात आले. इकडे रुग्णांची सेवा आणि तिकडे फक्त आईची भेट आणि मुलाची आठवण, या त्रेधा मन:स्थितीत सुनीता आपली सेवा करीत होती. १३ एप्रिल रोजीची संध्याकाळ तिच्यासाठी अंधारमय ठरली. दैवाने तिच्या आईला हिरावून नेले होते. लॉकडाऊनमुळे तिच्या अंत्ययात्रेला फक्त सुनीताचे पती, जळगावातील बहीण आणि मेहुणे एवढे चारच जण हजर होते. दोघा मुलींनी अग्निडाग दिला.वडिलांनाही आरोग्य सेवेचा वारसासुनीताचे वडील रणछोड वक्ते हेदेखील आरोग्य विभागात होते. आयुष्यभर कुष्ठ रोग्यांची सेवा केली. कॅन्सरने त्यांचा मृत्यू झाला होता. पण सेवेचा वारसा ते आपल्या मुलींना देऊन गेले होते. इकडे सासरी अमळनेरला साळी परिवारदेखील जनसेवेत परिचित आहे. प्रताप साळी, दीपक साळी दोन्ही जेठ कोरोनामध्ये गरिबांना धान्य वाटप व अन्नदान करीत आहेत. माहेरून आणि सासरी मिळालेला सेवेचा वारसा सुनीता अचूक जपत आहे.कोरोनाचा नायनाट होईल हीच खरी श्रद्धांजलीगहिवरलेल्या आवाज, अश्रूंवर नियंत्रण मिळवून सुनीता म्हणाली की, वेळीच आईला सिटीस्कॅन केले असते, उपचारासाठी आणले असते तर कदाचित आजही तिचे प्रेम मला मिळाले असते. पण तरी कोरोनांच्या रुग्णांची सेवा करून जळगावमधून कोरोनाचा नायनाट होईल हीच खरी आईला श्रद्धांजली असेल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmalnerअमळनेर