आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२० : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेख तस्लीम उर्फ काल्या शेख सलीम (वय २१ रा.दिनदयाल नगर, जामनेर रोड, भुसावळ) या गुन्हेगारावर बुधवारी स्थानबध्दतेची (एमपीडीए)कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सायंकाळी काल्याला स्थानबध्द करण्याचे आदेश दिले.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन त्याची रात्री नाशिक कारागृहात रवानगी केली.पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी जिल्ह्यातील धोकादायक व उपद्रवी असलेल्या गुन्हेगारांचे प्रस्ताव मागविले होते. भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सहायक निरीक्षक मनोज पवार यांनी काल्याचा प्रस्ताव तयार करुन पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविला होता. दत्तात्रय कराळे यांनी काल्यासह आणखी दोन जणांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे पाठविला होता. त्यातील शेख काल्या याच्या स्थानबध्दतेचे आदेश बुधवारी काढण्यात आले. आणखी दोन जणांवर लवकरच कारवाई अपेक्षित आहे.काल्यावर आठ गंभीर गुन्हेशेख काल्या याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला बलात्कार १,खंडणी १, दरोड्याचा प्रयत्न ३, बेकायदेशीरपणे घरात घुसून मारहाण करणे १, गंभीर दुखापत करणे १ व खुनाचा प्रयत्न करणे १ असे आठ गुन्हे गंभीर स्वरुपाचे दाखल आहेत. याशिवाय सीआरपीसी ११० प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
भुसावळ येथील शेख तस्लीम स्थानबध्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 9:15 PM
स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात
ठळक मुद्देकाल्यावर आठ गंभीर गुन्हे नाशिक कारागृहात रवानगीपोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी गुन्हेगारांचे मागविले प्रस्ताव