संजय हिरेखेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : वर्षानुवर्षांची मागणी असलेल्या खेडगाव-शिंदी रस्त्यावरील नाल्यावर पुलाचे काम अखेर मार्गी लागले आहे. जि.प.ने यासाठी २९ लाख रुपये निधी दिला आहे. यामुळे खऱ्या अर्थाने शिंदी व पेंडगाव ही गावे स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी प्रथमच थेट तालुक्याशी जोडली जाणार आहेत.नुकतेच या रस्त्याच्या कामाच्या फलकाचे अनावरण खेडगाव येथील माजी तंटामुक्ती अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले. यावेळी जि.प.चे माजी सभापती विकास पाटील, पं.स. सभापती रामकृष्ण पाटील, डॉ.विलास पाटील, संजय पाटील, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, अतुल पाटील, शिंदी, खेडगाव, शिवणी, पिचर्डे व बात्सर येथील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य व सोसायटी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. जि.प.सदस्या कल्पना पाटील यांनी लक्ष घालून निधी उपलब्ध करून घेतला आहे.सेतू बांधा रे... बांधा...शिंदी हे लोकसंख्येच्या दृष्टीने भडगाव तालुक्यातील मोठे गाव आहे. पुढे तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील पेंडगाव येते. ही दोन्ही गावे भडगाव तालुक्यात असली तरी रस्त्याअभावी पारोळ्याशी जुळलेली आहेत. महसूल, पोलीस स्टेशन, कोर्ट-कचेरी कामासाठी जावयाचे म्हणजे दोन किलोमीटरवरील खेडगाव येथे पायी येत. मगच भडगावी जावे लागत असे. १५ वर्षांपूर्र्वी शिंदी -खेडगाव रस्ता झाला, पण मार्गातील नदीवर पूल नसल्याने गैरसोय कायम होती. आता मार्च महिनाअखेरीस पूल पूर्णत्वास आला म्हणजे अडचण दूर होईल. याच रस्त्यावरील दोन नाल्यावरदेखील आमदार किशोर पाटील यांच्या निधीतून दोन फरशीच्या कामास सुरवात होणार असल्याची माहिती शिंदीचे डॉ.विलास पाटील यांनी यावेळी दिली.
शिंदी गावाला भडगाव तालुक्याशी जोडणारा सेतू साकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 7:53 PM
वर्षानुवर्षांची मागणी असलेल्या खेडगाव-शिंदी रस्त्यावरील नाल्यावर पुलाचे काम अखेर मार्गी लागले आहे. जि.प.ने यासाठी २९ लाख रुपये निधी दिला आहे. यामुळे खऱ्या अर्थाने शिंदी व पेंडगाव ही गावे स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी प्रथमच थेट तालुक्याशी जोडली जाणार आहेत.
ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा निधीस्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी खेडगाव-शिंदी रस्त्याचे भाग्य खुललेआतापर्यंत होता परक्या पारोळ्याशी संबंध, आता पुलामुळे येणार भडगाव तालुक्याशी संपर्क