जळगाव : समाजसेवेला राजकारणाची जोड देत जळगाव शहरातील शिरसाळे परिवाराने महापालिकेत प्रतिनिधीत्व केले आहे. शिरसाळे कुटुंबातील सहा सदस्यांनी महापालिकेत प्रतिनिधीत्व केले आहे.१९७६ पासून राजकारणात सक्रियस्व.नारायण शिरसाळे यांनी १९७६ पासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. तत्कालिन नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी विविध कामे केली. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पुलोद आघाडी निर्माण केली होती. या आघाडीच्या माध्यमातून त्यांनी जुना आठवडे बाजार भागातून पालिकेची निवडणूक लढविली.नगरपालिकेमध्ये केले प्रतिनिधीत्वपुलोद आघाडीतर्फे जळगाव शहरातील जबाबदारी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी सांभाळली. या आघाडीतर्फे नारायण शिरसाळे हे विजयी झाले होते. त्यांच्याकडे जकात समितीचे अध्यक्षपद सोपविण्यात आले होते. तब्बल दोन वेळा ते तत्कालिन नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते.अरुण शिरसाळे यांचे समाजकारणदोन वेळा नगरसेवकपद भूषविल्यानंतर त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मोठे पुत्र अरुण शिरसाळे यांनी एकता मित्र मंडळाच्या माध्यमातून विविध कामे करण्यास सुरुवात केली. या मंडळाच्या जळगाव शहरात १४ शाखा होत्या. त्यांना नाट्यक्षेत्राची आवड असल्याने ‘आम्ही जळगावकर’ ही नाट्य संस्थादेखील त्यांनी तयार करुन एकांकिका स्पर्धाही घेतली.शिवसेना शहर प्रमुखपदाची जबाबदारीअरुण शिरसाळे यांचे संघटन कौशल्य पाहून तत्कालिन शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश राणा यांनी शिवसेनेमार्फत काम करण्याची संधी देत शहर प्रमुखपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर १९९५ मध्ये पालिका निवडणुक त्यांनी लढविली. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले.चेतन शिरसाळे यांची राजकारणात एन्ट्रीशिरसाळे परिवारातून चेतन शिरसाळे यांनी खान्देश विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करीत विजय मिळविला. सध्या ते विद्यमान नगरसेवक आहेत. आता प्रभाग १६ अ मधून शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.आई व मुलगा दोघे एकाच वेळी नगरसेवकमातोश्री कलाबाई शिरसाळे व अरुण शिरसाळे हे विजयी झाले. त्यानंतरच्या पंचवार्षिकमध्ये त्यांचे बंधू अर्जुन शिरसाळे निवडणुकीत उभे राहिले. दरम्यान, अरुण शिरसाळे यांना उपनगराध्यक्षपदाचा सन्मान मिळाला.शिरसाळे दाम्पत्य महापालिकेतमहापालिकेच्या निवडणुकीत अरुण शिरसाळे व त्यांच्या पत्नी लाजवंती शिरसाळे या विजयी झाल्या. मनपाचे गटनेते म्हणून त्यांनी काम पाहिले. शिरसाळे दाम्पत्याने बचत गटांच्या समस्यांबाबत वेळोवेळी प्रश्न मांडत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
शिरसाळे परिवार : समाजकारणाला राजकारणाची जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:26 PM
कुटुंबातील पाच सदस्यांना नगरसेवकपदाचा मान
ठळक मुद्देशिवसेना शहर प्रमुखपदाची जबाबदारीनगरपालिकेमध्ये केले प्रतिनिधीत्व