जळगाव : वर्ध्या येथील राष्ट्रभाषा प्रचार समितीतर्फे सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रभाषा परीक्षेत शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी दिव्या ज्ञानेश्वर बारी ही देशातून प्रथम आली.राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धाचे परीक्षा अधिकारी छत्रपाल दांबर्डे यांचे पत्र बारी समाज माध्यमिक विद्यालयाला नुकतेच प्राप्त झाले आहे. दरम्यान, समितीतर्फे दीक्षांत समारोह रविवार ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता दिमापूर (नागालँड) येथे आयोजित केला आहे. या ठिकाणी दिव्या हिचा सन्मान करण्यात येणार आहे.दिव्या ही इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी युसूफ पठाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक एस.पी.पाटील, जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष व हिंदी शिक्षक रंगराव बारी, डी.जी.कुलकर्णी, सुरेखा वैष्णव, एस.एस.बारी यांची उपस्थिती होती. दिव्या हिच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे. तिचे वडील शिरसोलीपासून जवळ असलेल्या कंपनीत कामाला आहे. गरीबीची परिस्थिती असताना दिव्याने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.
राष्ट्रभाषा परीक्षेत जळगावातील शिरसोलीची दिव्या बारी देशात पहिली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 6:13 PM
वर्ध्यातील राष्ट्रभाषा प्रचार समितीतर्फे सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रभाषा परीक्षेत शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी दिव्या बारी ही देशातून प्रथम आली.
ठळक मुद्देदिव्या बारी समाज विद्यालयाची विद्यार्थीनीदिमापूर येथे होणार दीक्षांत समारंभराष्ट्रभाषा प्रचार समितीचे विद्यालयाला पत्र