जळगाव- धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित शिरिष चौधरी मुधकरराव चौधरी महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातर्फे आयोजित सॉफ्टवेअर टेस्टिंग इन इंडस्ट्रीज या विषयावरील कार्यशाळा नुकतीच झाली़कार्यक्रमात दिव्या पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती़ तर प्रेमकुमार पाटील यांच्यासह संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रियंका बºहाटे यांचीही उपस्थिती होती़ दरम्यान, कार्यशाळेत ३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता़ कार्यशाळेत सॉफ्टवेअर डेव्हलपेंटमधील वेगवेगळे फेजेस, मॉडेल्स व टेस्टिंगचे प्रकार, टेस्टिंग टेकनिक आदींबाबत विद्यार्थ्यांना समाजवून सांगितले़ तसेच प्रात्यक्षिक करून दाखवत विविध विषयांची माहिती देण्यात आली़ अखेर समारोप कार्यक्रमाप्रसंगी पाच प्रश्नांवर परीक्षा घेण्यात आली़ त्यात ऐश्वर्या परदेशी या विद्यार्थिनीने बक्षीस पटकाविले तर तर इतर सहभागी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ़आऱबी़वाघुळदे यांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले़ सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निकिता पाटील व मेघना बाविस्कर या विद्यार्थिनींनी केले़ यशस्वीतेसाठी प्रा़ कुमुदीनी पाटील, प्रा़ करिष्मा काळे, प्रा़ अक्षय पाटील, प्रा़ उत्कर्षा भंगाळे, दीपक पाटील, संदीप पाटील आदींनी परिश्रम घेतले़