निवेदनात म्हटले आहे की,
कोविडमुळे ओढवलेल्या बिकट परिस्थितीत नागरिकांना गेल्या ४ महिन्यांपासून नियमित वीज बिल देयके मिळाले नाहीत. आपल्या कार्यालयातर्फे नागरिकांना आता ३ -४ महिन्याचे वीज बिल एकत्रित देण्यात आले आहे. या बिलाची रक्कम फार मोठी असल्याने व लॉकडाऊनमुळें नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असल्याने हे बिल एकरकमी भरणे नागरिकांना शक्य नाही. त्यामुळे सक्तीची वीजबिल वसुली मोहीम राबवून नागरिकांची वीजजोडणी कट करणे, हे अन्यायकारक आहे.
तरी नागरिकांना वीज बिल अदा करण्यात ३-४ टप्प्यांची विशेष सवलत द्यावी अन्यथा आम्हास आंदोलन करावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर गटनेते प्रवीणकुमार पाठक, प्रतोद सलिम टोपी, उपगटनेते सविता संदानशिव, नगरसेवक देवीदास महाजन, अनिल महाजन, पंकज चौधरी, महेश जाधव, धनंजय महाजन, योगराज संदानशिव, किरण बागुल, संतोष लोहेरे, हरिष देशपांडे, राघव देशपांडे, पराग चौधरी आदींच्या सह्या आहेत.