शिरसोली परिसरातील शेतकरी वर्ग नैसर्गिक आपत्ती, कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला तर कधी पिकांना भावच नाही, अशा विविध संकटांनी ग्रासलेला असताना वीज वितरण कंपनीच्या मागील थकीत विज बिलांमुळे महावितरण कंपनीने शिरसोली शेतशिवारातील ३०/३५ विद्युत रोहित्रांवरील वीजप्रवाह बंद केला आहे. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेल्या गहू, मका, ज्वारी, भुईमूग यासह इतर पिके वीज व पाण्याअभावी जळून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय, यामुळे शेतकरी वर्ग चिंतातुर झाला आहे. तरी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा शेतातील वीजप्रवाह पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
-------------प्रतिक्रिया. ------------
वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना वीजबिलात सवलत दिलेली आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी तीन लाखांच्या थकीत वीज बिलाचे निदान पन्नास हजार रुपये व चालू बिल भरणे अवश्यक आहे. शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे. आम्हाला वरून आदेश असल्याने कारवाई करणे भाग आहे.
-समीर नेगळे, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, शिरसोली.