शिरसोली प्र नं. : शिरसोली प्र नं. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी हिलाल भिल तर उपसरपंचपदी श्रावण ताडे (बारी) यांची बिनविरोध निवड झाली.
दरम्यान, नवनिर्वाचित उपसरपंच श्रावण ताडे यांनी जळगाव पंचायत समितीचे उपसभापतीपदही भुषविले आहे. त्यांनी पुन्हा ग्रामपंचायत निवडणूक लढविली व उपसरपंचपदी विराजमान झाले आहेत.
सरपंचपद हे एसटी राखीव असल्याने या प्रवर्गातील हिलाल भिल हे एकमेव सदस्य असल्याने त्यांची निवड ही निश्चितच मानली जात होती. उपसरपंचपदासाठी रस्सीखेच सुरू असताना श्रावण बारी (ताडे) यांनी बाजी मारली. या वेळी ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण काटोले, शशिकांत अस्वार, विनोद बारी, मुदस्सर पिंजारी, गौतम खैरे, भगवान पाटील, सदस्या सकुबाई पाटील, भागाबाई बारी, ज्योत्स्ना पाटील, द्वारकाबाई बोबडे, सुरेखा मराठे, शारदा पाटील, पुष्पलता सोनवणे, मीना बोबडे व जमनाबाई साबळे उपस्थित होत्या.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.पी.पाटील, तलाठी भरत नन्नवरे यांनी काम पाहिले. ग्रामविकास अधिकारी डी.आर. शिरतुरे, लिपिक नाना पाटील, चंद्रभाण बारी, उमाकांत महाजण, पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी मदत केली. जितेंद्र राठोड,राजू ठाकरे, नीलेश भावसार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.