ठळक मुद्देपरिसरात भीतीचे वातावरण वासराचेही लचके तोडले
ऑनलाईन लोकमत
दापोरा / शिरसोली जि. जळगाव, दि. 30 - जळगाव तालुक्यातील शिरसोली व दापोरा परिसरात बिबटय़ाचा संचार पुन्हा वाढला असून सोमवारी मध्यरात्री गाय व म्हशीचा फडशा पाडला.
दापोरा येथे रवींद्र वसंत काळे यांच्या मावकीचे गुरे गावा शेजारी खळ्यात बांधली होती. त्या ठिकाणी एका म्हशीच्या पारडूवर हल्ला करीत त्याला ठार केले. या सोबतच बाजूलाच बांधलेल्या वासराचेही लचके तोडले. शिरसोली परिसरात नायगाव शिवारातील भागात हरीशंकर पाटील यांच्या मालकीच्या गायवर हल्ला करीत तिलादेखील ठार केले. यामुळे पुन्हा एकदा शिरसोली व दापोरा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने लक्ष देत बिबटय़ाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.