जळगाव : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामार्फ़त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सेट परीक्षेत शितल ललित पवार यांनी यश संपादन केले आहे. ललित पंडित पवार यांच्या पत्नी आहेत. तर निवृत्त पर्यवेक्षक पी.यु.पवार व प्रमिला पंडित पवार यांच्या सून आहेत. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
===================
वयोवृध्दांना घरोघरी जावून लसीकरण करावे
जळगाव : जिल्ह्यातील वयोवृध्दांना घरोघरी जावून लसीकरण करण्यात यावे,अशी मागणी युवा सेनेचे भूषण सूर्यवंशी यांनी केली आहे. लसीकरण केंद्र दूर असल्यामुळे अनेकजण टाळाटाळ करीत असतात. त्यामुळे प्रत्येक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये सुध्दा लसी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
==================
कंडारी येथे कुटुंब सर्वेक्षण मोहीम
जळगाव - तालुक्यातील कंडारी गावात कोविड नियंत्रणासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत चौथ्या फेरीचे कुटुंब सर्वेक्षण करण्यात येत आहे. नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जळगाव तालुक्यातील कंडारी येथे गेल्या अनेक दिवसांपासून कुटुंब सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. चौथ्या फेरीच्या सर्वेक्षण करण्यासाठी आरोग्य व शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली आशा वर्कर भारती सुभाष पाटील, अंगणवाडी सेविका मंगला प्रकाश कुंभार, विनोद निवृत्ती जयकर, सुभाष पाटील, वैशाली शशिकांत सुर्वे, भारती प्रदीप सुर्वे, जि.प. शिक्षक डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील, स्वयंसेविका आशा वर्कर संगीता देशमुख यांचा या पथकात सहभाग आहे.