तापी-पांझरा पवित्र संगमावरील पुरातन श्रीक्षेत्र कपिलेश्वर देवस्थानी शिवसहस्रार्चन पूजन होत आहे. कपिल मठाधिपती महामंडलेश्वर श्री हंसानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाने कोरोना नियमावलीचे पालन करीत, परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
१६ ऑगस्ट रोजी १००८ दांपत्याचे हस्ते सामूहिक श्रीसत्यनारायण महापूजा होईल. महाराजांचे मंगल प्रवचन, महाप्रसाद वितरणातून समाप्ती होईल
निम येथेही श्रीविठ्ठल-रूक्मिणी मंदिरात श्रावण मासानिमित्त पहाटे काकड आरती, पुरोहित लक्ष्मण जोशी 'हरिविजय' ग्रंथाचे जाहीर वाचन करीत असून, संध्याकाळी 'हरीपाठ' म्हटले जात आहे. दररोजच्या या उपक्रमामुळे गावातील ५० तरुणांचे गायन, संगीत वाजन, आध्यात्मिक संघटन बनले आहे. लोटन नारायण पाटील हे मार्गदर्शक आहेत.
कळमसरे येथेदेखील श्रावण मासानिमित्ताने श्रीराम मंदिरात दररोज काकडा आरती, भजन, कीर्तन असे कार्यक्रम होत आहेत.