भुसावळ : शिवसेनेतर्फे साकेगाव येेथे रविवारी शिवसंपर्क अभियानानिमित्त बैठक घेण्यात आली. सेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला एकाकीपणा जाणवू देणार नाही. तसेच साकेगाव ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्या, त्यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी पक्ष संघटना ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील. शिवसेना उपनेते, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्यामार्फत साकेगावचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे यांनी दिली.
पक्ष विस्तार आणि संघटना बांधणी याचे पक्षीय आदेश वेळोवेळी अमलात आणले जात आहे, असे माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी सांगितले. यावेळी तालुका संघटक धीरज पाटील, उपतालुकाप्रमुख हिरामण पाटील, सरपंच प्रतिनिधी विष्णू सोनवणे, रवि पाटील, बबलू धनगर, भूषण पवार, गोमा मराठे, अनिल सोनवल, युवराज कोळी, भूषण पाटील, पप्पू पटेल व मान्यवर उपस्थित होते.