लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : काही दिवसांपूर्वी चार जिल्हाप्रमुखांची नियुक्ती केल्यानंतर आता जळगाव शहरातील संघटनावाढीसाठीदेखील सेनेने नवीन पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर केली आहे. शनिवारी मुंबईहून जळगाव शहराच्या ३२ नवीन पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये १२ उपमहानगरप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली असून, १८ विभागप्रमुखांची तर प्रसिध्दीप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व कार्यकारणीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली असून, जुन्या कार्यकर्त्यांना या कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे सेनेत पुन्हा नवा-जुना वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिवसेना कार्यालयाचे रुपडे पालटणार
शिवसेनेच्या संघटनेत बदल होत असताना, दुसरीकडे गोलाणी मार्केटमधील शिवसेना कार्यालयाचे नूतनीकरणाचे कामदेखील सुरू झाले आहे. रविवारी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे व महानगरप्रमुख शरद तायडे यांनी कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या कामाचा आढावा घेतला. डिजिटल यंत्रणेसह बैठकीसाठी नवीन कार्यालय सुसज्ज करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी दिली.
सेनेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
उपमहानगरप्रमुख - प्रवीण पटेल, नितीन सपके, ललित धांडे, मानसिंग सोनवणे, मधुर झंवर, गणेश गायकवाड, जितेंद्र साळुंखे, तस्लीम पटेल, कॉमेश सपकाळे, ॲड.सचिन मराठे, प्रशांत सुरळकर, नितीन राजपूत यांचा समावेश आहे.
विभाग प्रमुख - विनोद सपकाळे, विजय बांदल, राहुल ठाकरे, अमोल सोनवणे, वाल्मीक महाजन, अमोल धांडे, योगेश गालफाडे, श्रीकांत आगळे, प्रशांत फाळके, मोहसीन गफूर, नीलेश कोळी, दर्शन चौधरी, हितेंद्र पाटील, सागर कोल्हे, दीपक कुकरेजा, शंतनू नारखेडे, अरबाज पटेल, रोहिदास सोनवणे,
कार्यालयप्रमुख - संजय सांगळ, प्रसिध्दीप्रमुख -उमेश चौधरी यांचा समावेश आहे.