पारोळा तालुका शिवसेनेकडून पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना गुन्हे दाखल करणेबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना शिवसेनेच्या वतीने गुन्हा दाखलबाबत निवेदन देण्यात आले.
मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिवसेनेच्या वतीने महामार्गावर घोषणा देऊन राणेंच्या प्रतिकात्मक फोटोची जाळपोळ करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख प्रा. आर. बी. पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, जळूचे माजी सरपंच रवींद्र जाधव, राजू बागडे, युवा सेनेचे आबा महाजन यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
छाया--पारोळा येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या फोटोची जाळपोळ व निषेध व्यक्त करतांना डॉ. हर्षल माने व शिवसेनेचे कार्यकर्ते.