शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
3
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
4
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
5
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
6
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
7
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
8
धुळे जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात सर्व पक्षांना मत विभाजनाची भीती
9
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
10
मविआतील नेत्यांच्या फोटोंचा वापर; शेकाप उमेदवारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी!
11
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
12
जंगल थीम, केक अन्...; आलिया-रणबीरच्या लेकीचा दुसरा वाढदिवस, राहाच्या बर्थडे पार्टीतील Inside फोटो
13
अर्जुन कपूर करतोय एकटेपणाचा सामना? मलायकाशी ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला
14
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
15
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
16
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
17
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
18
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!
19
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
20
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी

भाजपशी कायमचे शत्रूत्व नाही, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हेंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 7:14 PM

कोरोनामुक्त गावे, गरजूंना मदत देण्यासाठी शासनाच्या  योजना तसेच शिवसंपर्क मोहिमेचा आढावा घेण्यासाठी डॉ. गोऱ्हे शुक्रवारी जळगावात आल्या होत्या.

ठळक मुद्देकोरोनामुक्त गावे, गरजूंना मदत देण्यासाठी शासनाच्या  योजना तसेच शिवसंपर्क मोहिमेचा आढावा घेण्यासाठी डॉ. गोऱ्हे शुक्रवारी जळगावात आल्या होत्या.

जळगाव : राजकारणात कायमचे कोणी कोणाचे शत्रू नसते, आज भाजपशी केवळ मतभेद असले तरी तो पक्ष शिवसेनेचा कायमचा शत्रू आहे असे नाही. या पक्षांच्या युतीबाबत मी बोलत नाही, मात्र भविष्यात काय होऊ शकते सांगता येत नाही, असे वक्तव्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी जळगावात केले. या सोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीतून ते एकत्रदेखील येऊ शकतात, मात्र कार्यकर्त्यांचे काही खरे वाटत नाही, असेही स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. 

कोरोनामुक्त गावे, गरजूंना मदत देण्यासाठी शासनाच्या  योजना तसेच शिवसंपर्क मोहिमेचा आढावा घेण्यासाठी डॉ. गोऱ्हे शुक्रवारी जळगावात आल्या होत्या. या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संवाद साधताना त्यांनी आजच्या राजकीय घडामोडींसह विविध पक्षांच्या भूमिकेबद्दल मत व्यक्त केले. 

विश्वासघात झाल्याने इतर पक्षांकडे वळलोभाजप व शिवसेना यांची पुन्हा युती होऊ शकते का, या विषयावर डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, या विषयी पक्षप्रमुख, प्रवक्ते बोलतील. मात्र ज्या वेळी या दोन्ही पक्षाची युती होती, त्या वेळी मीदेखील समन्वय समितीमध्ये होते. ही युती का तुटली, ज्या मुद्यावर मतभेद झाले याकडेदेखील लक्ष देणे गरजेचे आहे. युतीच्या वेळी जे ठरले त्यात विश्वासघात झाल्याने आम्ही इतर पक्षांकडे वळलो, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

शिष्टाचाराचा भाग म्हणून भेट असावीभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीविषयी डॉ. गोऱ्हे यांना विचारले  असता ते म्हणाल्या की, ही एक उत्सुकतेची कहाणी आहे. हे दोन्ही पक्ष स्वंतत्र आहे, ते भेटू शकतात.  राजकारण असल्याने यात काहीही होऊ शकते. कदाचित शिष्टाचाराचा भाग म्हणूनही ते एकमेकांना भेटले असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. या भेटीतून ते एक एकत्रदेखील येऊ शकतात, मात्र कार्यकर्त्यांचे एकत्र येणे अशक्य वाटते, असेही भाकीत त्यांनी वर्तविले. 

शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्यांचे काय झाले?शिवसेना संपली, असे गेल्या अनेक दिवसांपासून म्हटले जात होते. मात्र शिवसेनेने पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतली. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना संपवू, अशी भाषा करणाऱ्यांचे काय झाले, हे सर्वच जण पाहत असल्याचे सांगत त्यांनी भाजपला टोला लगावला. 

‘व्हॅक्सीन डिप्लोमॅसी’ थांबवाआज कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असला तरी केंद्र सरकारचे धोरण मारक ठरत असल्याचा आरोप डॉ. गोऱ्हे यांनी केली. लस उत्पादन करणाऱ्या सर्वच कंपन्यांशी करार केला असता तर लस पुरेसा प्रमाणात उपलब्ध झाली असती. तसेच लसीकरणाच्या पहिल्याच टप्प्यात सर्वांसाठी लस दिली असती तर कदाचित डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण झालेही असते, असेही मत त्यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारच्या धरसोड धोरणामुळे राज्याला फटका बसत असल्याचेही त्या म्हणाल्या. व्हॅक्सीन डिप्लोमॅसी थांबवा, असा सल्लादेखील त्यांनी दिला. 

‘लोकमत’चा आवर्जून उल्लेखमहिला विकासासाठी करीत असलेल्या कामात वेळोवेळी यश आले आहे. याची दखल लोकमतने घेतली व ती राज्यभरात पोहचविली, यामुळे जनजागृती होण्यास अधिक मदत झाल्याचाही उल्लेख डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत केला. 

टॅग्स :JalgaonजळगावShiv SenaशिवसेनाNeelam gorheनीलम गो-हेBJPभाजपा