शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

मंत्री एकनाथ शिंदेंचं बंड, जळगावातील शिवसेनेचे आमदार कुठं?; वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 2:13 PM

मंत्री शिंदेंसोबत जळगाव जिल्ह्यातील काही आमदार असल्याचं सांगितलं जातंय.

प्रशांत भदाणे

जळगाव : शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांसह गुजरातमध्ये गेल्याने ठाकरे सरकार धोक्यात आलंय. मंत्री शिंदेंसोबत जळगाव जिल्ह्यातील काही आमदार असल्याचं सांगितलं जातंय. जिल्ह्यात शिवसेनेचे चार आमदार आहेत, तर एक अपक्ष आमदार हा शिवसेनेचा सहयोगी आमदार आहेत. या पाच आमदारांपैकी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह दोन आमदार हे मुंबईत तर एक आमदार दिल्लीत आहेत. मंत्री शिंदेंसोबत जिल्ह्यातील फक्त एक आमदार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे चार आमदार आहेत. त्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील, पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील, पाचोऱ्याचे किशोर पाटील, चोपड्याच्या लता सोनवणे यांचा समावेश आहे. तर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार शिवसेनेचे सहयोगी आमदार आहेत. यातील पालकमंत्री गुलाबराव पाटील, अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, आणि चिमणराव पाटील हे मुंबईत असल्याचे सांगितले जात आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी फोनवरून आपण मुंबईत असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले. आमदार चिमणराव पाटील व चंद्रकांत पाटील यांचा फोन नॉट रिचेबल आहेत. पण ते मुंबईतच असल्याची सूत्रांची माहिती आहे. आमदार लता सोनवणे या वैयक्तिक कामानिमित्त दिल्लीत आहेत. त्यांनी स्वतः ही माहिती माध्यमांना दिलीये. फक्त पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील हे नॉट रिचेबल आहेत. ते मंत्री शिंदेंसोबत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निकटवर्तीयांना देखील त्यांच्या लोकेशनबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नाहीये.

आमदार किशोर पाटील हे मंत्री शिंदेंच्या जवळचेआमदार किशोर पाटील हे मंत्री एकनाथ शिंदेंच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात. त्यामुळे ते शिंदेंसोबत जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील इतर आमदारांच्या बाबतीत संभ्रमाची स्थिती आहे. ते मंत्री शिंदेंच्या बाजूने जाऊ शकतात किंवा नाही, याबाबत ठोस माहिती मिळाली नाही.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेJalgaonजळगाव