शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

"३५ वर्ष वडापाव खावून शिवसेनेचे काम केले आणि जनतेमधून निवडून न येणारे आम्हाला त्यागाची भाषा शिकवता"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 7:38 PM

गुलाबराव पाटीलांची राऊत, सावंतावर टीकास्त्र ; आमचे बंड शिवसेना फोडण्यासाठी नाही तर शिवसेना वाचविण्यासाठी - पाटील

अजय पाटील

जळगाव - कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मनात घेवून, शालेय जीवनापासून शिवसेनेसाठी काम केले आहे. ३५ वर्ष वडापाव खावून मुंबईला बाळासाहेब ठाकरे यांचे भाषणं ऐकली, संघटनेचे काम केले. तेव्हा कुठे मंत्रीपद मिळाली. आज जे आमच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत,असे संजय राऊत जनतेमधून कधिही निवडून आलेले नाहीत. ज्यांची जनतेमधून निवडून येण्याची हिंमत यांची होत नाही, ते आम्हाला आज त्यागाची भाषा शिकवत आहेत, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारत सेनेचे ३९ आमदार आपल्या बाजूने खेचले आहेत. त्यात शिवसनेचे निष्ठावंत नेते व खान्देशची मुलुखमैदान तोफ समजले जाणाऱ्या गुलाबराव पाटील यांचाही समावेश आहे. गुलाबराव पाटील यांनीही शिवसेनेविरोधात बंड पुकारल्याने त्यांच्यावर शिवसेनेच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. तसेच त्यांच्या निष्ठेवर देखील प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. या सर्व आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्यात पहिल्यांदाच गुलाबराव पाटील यांनी आपली भूमिका ‘लोकमत’व्दारे मांडली आहे. या सर्व घडामोडींवर व बंडाच्या कारणांबाबत गुलाबराव पाटील  ‘लोकमत’कडे व्यक्त झाले आहेत.

४० आमदार सोडून गेले, तरी शरद पवारांना सोडायला तयार नाही

शिवसेनेतून एकटा गुलाबराव पाटील फुटला असता तर मान्य केले असते की स्वार्थासाठी पक्ष सोडला. मात्र, या बंडात एकटा गुलाबराव पाटील नसून, शिवसेनेचे ४० आमदार आहेत. त्यापैकी अनेक आमदार गेल्या ४० वर्षांपासून शिवसेनेचे काम करत आहेत. ४० आमदारांवर शिवसेना सोडण्याची वेळ का आली ? याचा विचार पक्ष नेतृत्वाकडून होणे गरजेचे असताना, शिवसेनेचे प्रवक्ते या आमदारांवर खालच्या भाषेत टीका करत आहेत. आमची व सर्व आमदारांची मागणी एकच आहे. मविआतून बाहेर निघा, मात्र पक्षप्रमुख ४० आमदारांना सोडू शकतात, वर्षा बंगला सोडला, शिवसेना फुटू द्यायला तयार आहेत. मात्र, शरद पवारांना सोडायला तयार नाहीत, हे शिवसेनेचे दुर्देव असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

२ महिन्यांपूर्वीच नाराजीची मुख्यमंत्र्यांना दिली होती कल्पनाशिवसेनेतील मंत्र्यांची कामे होतात. मात्र, शिवसेनेच्या आमदारांची छोटी-छोटी कामे देखील होत नाहीत. यामुळे आमदार नाराज असल्याची माहिती पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली होती. मात्र, पक्ष प्रमुखांनी या माहितीकडे दुर्लक्ष केले. जर पक्ष प्रमुख राज्यात फिरू शकत नाहीत. तर आदित्य ठाकरे यांना राज्यात फिरून संघटनेचे मेळावे घ्यावेत असा ही सल्ला दिला. मात्र, आदित्य ठाकरेंनी देखील याकडे दुर्लक्ष केले. ८ महिन्यांपुर्वी संजय राऊत यांनाही आमदारांच्या नाराजीबाबत कल्पणा दिली. मात्र, तेव्हाही लक्ष दिले गेले नसल्यानेच आज ही वेळ शिवसेनेवर आली असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

मला विचारूनच गुलाबराव वाघ सेनेच्या मेळाव्याला गेलेसहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, सोमवारी शिवसेनेच्या मेळाव्यात जाण्याबाबत गुलाबराव वाघ यांनी मला फोन केला. तसेच मी मेळाव्यात जात आहे, याबाबत त्यांनी सांगितले. गुलाबराव वाघ हे भावासारखे असून, त्यांनी आतापर्यंत मला मदतच केली आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेला मी उत्तर देऊ शकत नसल्याचे सांगितले.

संजय राऊतांना योग्य वेळी चूना लावूसंजय राऊत यांना माहिती नाही, पान टपरीवाल्याला चांगला चूना देखील लावता येतो. संजय राऊतांना योग्य वेळी चूना लावण्याचेही काम करू असा इशारा गुलाबराव पाटील यांनी बुधवारी गुवाहाटी मध्ये उपस्थित आमदारांच्या बैठकीत दिला आहे. आमची स्टोरी  राऊतांना सांगितली तर १९९२ च्या दंगलीत आम्ही तीघं भाऊ आणि आमचा बाप जेल मध्ये होतो. त्यावेळी संजय राऊत कुठे होते ते माहिती नाही..? राऊतांना कलम ५६ काय असते, ३०२ काय असते हे माहिती नाही. दंगलीच्या वेळेत पायी चालण काय असते , तडीपार काय असते  हे त्यांना माहिती नाही, आणि आम्हाला त्यागाच्या गोष्टी शिकवता आहेत असा टोला या बैठकीत गुलाबराव पाटील यांनी लगावला.काय म्हणाले गुलाबराव पाटील

१. आमचे बंड शिवसेना वाचविण्यासाठीच आणि आम्ही शेवटपर्यंत शिवसेनेतच

२. आमची निष्ठा ‘ठाकरे’ आडनावाशी सदैव कायम राहिल, मातोश्री आमच्यासाठी देव्हाऱ्यासारखेच राहिल.

३. शिवसेनेने आमच्या नक्कीच उपकार केले हे आम्ही मान्य करुच, मात्र आम्ही केलेल्या संघर्षाचे काहीच मोल नाही ..?

४. जिल्ह्यातील १५०० पैकी १ हजार गावांमध्ये शिवसेनेच्या शाखा सुरु केल्या, त्याचा विसर आम्हाला गद्दार ठरविले जात आहे.

५. आम्ही शिवसेनेचे काम केले, संघर्ष केला. म्हणूनच तर आम्हाला पदं मिळाली.

६. घरात तुळशीपत्र ठेवून, बाहेर शिवसेनेचे काम केले. अनेकवेळा तुरूंगात गेलो,आमच्यावर अजूनही असंख्य केसेस आहेत

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ