शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांना उच्च न्यायालयाकडून जामीन, १० वर्षांनंतर जळगावात दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 02:00 PM2022-11-30T14:00:26+5:302022-11-30T14:03:17+5:30
Sureshdada Jain: शिवसेनेचे नेते व माजीमंत्री सुरेशदादा जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून बुधवारी नियमित जामीन मंजूर झाला आहे. तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकूल घोटाळ्यात 10 मार्च 2012 मध्ये सुरेशदादांना अटक झाली होती.
- प्रशांत भदाणे
जळगाव - शिवसेनेचे नेते व माजीमंत्री सुरेशदादा जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून बुधवारी नियमित जामीन मंजूर झाला आहे. तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकूल घोटाळ्यात 10 मार्च 2012 मध्ये सुरेशदादांना अटक झाली होती. उच्च न्यायालयाने नियमित जामीन दिल्याने सुरेशदादा यांचा जळगाव येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकूल घोटाळ्यात 10 मार्च 2012 मध्ये सुरेशदादा जैन यांना अटक झाली होती. या घोटाळ्यात शिक्षा झाल्यानंतर ते जवळपास साडेचार वर्षे तुरुंगात होते. दरम्यानच्या काळात सुरेशदादांना सप्टेंबर 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला होता. पण त्यात न्यायालयाने मुंबईत राहण्याची अट घातली होती. जळगावात येण्यास त्यांना प्रतिबंध घालण्यात आला होता.
दरम्यान, सुरेशदादा जैन यांनी घरकुल घोटाळ्यात आपल्याला नियमित जामीन मिळावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्यावतीने ऍड. आबाद पोंडा यांनी न्यायालयात बाजू मांडली. अखेर उच्च न्यायालयाने सुरेशदादांना नियमित जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांचा जळगावात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.