तीन दिवसांत ४९४ जणांची नोंदणी :
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महानगर शिवसेनेकडून शहरात सदस्य नोंदणीस सुरुवात झाली असून, पहिल्या तीन दिवसांत ४९४ सदस्यांची नोंदणी झाली आहे. शनिवारी गोलाणी मार्केट भागातून सदस्य नोंदणीस प्रारंभ झाला. यावेळी शिवसेना जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, विधानसभा संपर्कप्रमुख समाधान पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, महानगर संघटक दिनेश जगताप, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर विष्णू भंगाळे, गटनेते अनंत जोशी, नगरसेवक नितीन बरडे, मनोज चौधरी, खुबचंद साहित्या, अंकुश कोळी आदी उपस्थित होते.
यावेळी संपर्कप्रमुख संजय सावंत म्हणाले की, जनतेच्या प्रश्नांची जाण शिवसेनेला नक्कीच आहे. जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यात पक्षाची भूमिका नेहमी सकारात्मकच राहिली असल्याने शिवसेनेकडे सामान्य माणसांसोबतच युवकांचाही ओघ वाढला आहे. जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अल्पसंख्याक आघाडी महानगरप्रमुख जाकीर पठाण, उपमहानगर मानसिंग सोनवणे, प्रमुख प्रशांत सुरळकर, कोमेश सपकाळे, जितू साळुंखे, गणेश गायकवाड, पूनम राजपूत, दीपक कुकरेजा, विराज कावडिया, अमित जगताप, ईश्वर राजपूत, वसीम खान, विजय बांदल, विजय राठोड, इक्बाल शेख, विकास पाटील, अजय ठाकूर, अक्षय सोनवणे यांनी परिश्रम घेतले.