जळगाव : जिल्हा सामान्य रूग्णालयातील अस्वच्छता, रूग्णांची लूट आदी मुद्यांवरून शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांना निवेदन देऊन याबाबत कडक पावले उचलण्याची मागणी केली़ मागणी मान्य न झाल्यास रूग्णालय आवारात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे़निवेदनात म्हटले आहे की, वार्ड १, ७, ९, १२ मध्ये अतिशय दुर्गंधी व अस्वच्छ स्वच्छतागृहे आहेत़ याठिकाणी नियमित स्वच्छता करावीत, अनेक डॉक्टर्स बाहेरील औषधी वेगवेगळ्या चाचण्या करण्यासाठी दबाव आणत असल्याचे निदर्शनास आले असून गरीब रूग्णांची आर्थिक लूट होत आहे, ती थांबवावी, जिल्हा रूग्णालयाकडून केली जाणारी जेवणाची व्यवस्था अतिशय निकृष्ट असते हा ठेका बंद करून नवीन व्यक्तिस द्यावा, आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत़ आपण स्वत: याकडे लक्ष घालून या समस्या सोडवू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे गजानन मालपुरे यांनी सांगितले़ निवेदन देताना भगवान सोनवणे, सुनील ठाकूर, लोकेश पाटील, बबलू सपकाळे, विनायक पाटील, जगदीश सोनवणे, निशांत काटकर, मनिष सपकाळे, विजय चौधरी, ललित कोतवाल, बबलू कोळी, विशाल ठाकूर, नरेंद्र शिंदे, विजय लोहार आदी उपस्थित होते़म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनपदाधिकारी अधिष्ठाता डॉ़ बी एस़ खैरे यांची भेट घ्यायला गेले होेते, मात्र ते नसल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांची त्यांनी भेट घेऊन समस्या मांडल्या मात्र, आपल्याला अधिकार नसल्याचे डॉ़ चव्हाण यांनी सांगितल्याने पदाधिकाºयांनी संताप व्यक्त केला व अखेर जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले़ सिव्हील व महाविद्यालयाच्या वादात सामान्य जनता भरडली जात असून असे होता कामा नये, असे गजानन मालपुरे यांनी म्हटले आहे़
‘सिव्हील’मधील अस्वच्छतेवरून शिवसेना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 9:27 PM