लोकमत ऑनलाईन चोपडा, दि.0 : शहर व तालुक्यात मोठय़ा प्रमाणात होणारे विजेचे भारनियमन आणि त्यात विजेच्या वाढीव बिलाची आकारणी या विरोधात तालुका शिवसेनेतर्फे सोमवारी सकाळी 11 वाजता येथील वीज वितरण कंपनीच्या (अर्बन) विभागीय कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या मोर्चात तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि महिलांचा मोठय़ा प्रमाणात समावेश होता. हा मोर्चा शिवसेनेच्या म्युनिसिपल हायस्कूल शेजारील कार्यालयापासून तर मेनरोडमार्गे गुजराथी गल्लीतील हेडगेवार चौकातील वीज वितरणच्या विभाग 1 कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी या कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता व्ही. बी. सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील विजेचे होणारे भारनियमन रद्द करा आणि वाढीव बिल कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशा आशयाचे निवेदन सोनवणे यांना देण्यात आले. त्यासोबतच त्यांना रॉकेलवर चालणारी एक लहान चिमणी (दिवा) ही भेट देण्यात आली. मोर्चात माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, नगरसेवक किशोर चौधरी, शिवसेनेचे गटनेते महेश पवार, पंचायत समितीचे उपसभापती व्ही. एम. पाटील, राजाराम पाटील, महेंद्र धनगर, दीपक चौधरी, दीपक जोहरी, राजेंद्र बेटवा रमेश राजपूत, शरद पाटील, प्रवीण जैन, महेंद्र भोई यासह शेकडो शिवसैनिक व महिला पदाधिका:यांचा समावेश होता .
वाढते भारनियमन व वाढीव बिलाविरोधात शिवसेनेतर्फे चोपडय़ात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 6:09 PM
चोपडा तालुक्यात मोठय़ा प्रमाणावरील विजेचे भारनियमन सुरू असतांना त्यात वाढीव वीज बिलांची भर पडली असून त्याच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेनेतर्फे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन अधिका:यांना चिमणी (दिवा) भेट देण्यात आली.
ठळक मुद्देशिवसेनेच्या मोर्चात महिलांचा मोठा सहभागतालुक्यातील पदाधिका:यांनी दिले भारनियमन तात्काळ रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन