शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

जळगावात मनपाच्या नगररचना विभागाला कुलूप ठोकले शिवसेनेच्या गटनेत्यास अटक व सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:42 PM

महापौर निवडीपूर्वीच भाजपा व सेनेत रंगला ‘सामना’

ठळक मुद्देगुन्हा दाखलसाठी प्रतिष्ठा पणालाअधिकारी अवघ्या दहा मिनीटातच मनपात परतले

जळगाव : मनपाच्या नगररचना विभागात गेल्या सहा महिन्यांपासून बांधकाम मंजुरीच्या फाईलींचा निपटारा होत नसल्याने सोमवारी शिवसेनेचे मनपा गटनेते अनंत जोशी यांनी सकाळी १०.१५ वाजता नगररचना विभागाला कुलूप ठोकले.पोलीस व उपायुक्तांच्या मध्यस्थीने त्यांनी पंधरा मिनिटातच कुलूप उघडले. मात्र, त्यानंतर जोशींवर गुन्हा दाखल करण्यासाठी दिवसभर नाट्य रंगले. गुन्हा दाखल होऊ नये यासाठी सेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी तर गुन्हा दाखल व्हावा यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे यांनी प्रतिष्ठा पणास लावली. अखेर सायंकाळी गुन्हा दाखल होऊन जोशींना अटकही झाली त्यानंतर जामीनावर त्यांची सुटका झाली.मनपा नगररचना विभागात गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे ३०० ते ३५० बांधकाम फाईल्स मंजुरीसाठी पडून आहेत. त्यांचा निपटारा व्हावा यासाठी अनंत जोशी हे सोमवारी सकाळी १० वाजता नगररचना विभागात आले. मात्र, या ठिकाणी अधिकारी उपस्थित नव्हते. तर केवळ एक अभियंता व एक कर्मचारी उपस्थित होता.तुम्ही तुमचे काम केले आम्ही आमचे काम करुजोशी यांनी आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याकडे नगररचना विभागात फाईलींचा निपटारा होत नसल्याची तक्रार केली. मात्र,आयुक्तांनी आंदोलनाचा हा मार्ग चुकीचा असल्याचे सांगत ‘तुम्ही तुमचे काम केले, आता आम्ही आमचे काम करु’ असे जोशी यांना सांगितले. त्यानंतर मनपा अधिकाऱ्यांना या प्रकरणी जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.आयुक्तांच्या सूचनेनंतर नगरचना विभागाचे अधिकारी शहर पोलीस ठाण्यातमनपा आयुक्तांनी नगररचना विभागाच्या अधिकाºयांना जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर नगररचना सहाय्यक संचालक अनंत धामणे यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी शहर पोलीस स्टेशन गाठले. मात्र, सुमारे अर्धातास पुढचे आदेश येईपर्यंत सर्व अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्यातच थांबून होते. त्यानंतर अर्धा तासानंतर शहर पोलीस ठाण्यात जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रि येला सुरुवात केली.गुलाबरावांची आयुक्तांना विनंती अन् मनपा कर्मचारी पोलीस स्टेशनमधून फिरले माघारीआयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर हा गुन्हा दाखल होवू नये म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आयुक्तांना फोन करून गुन्हा दाखल न करण्याची विनंती केली. त्यानंतर आयुक्तांनी देखील शहर पोलीस ठाण्यात जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या सर्व अधिकाºयांना गुन्हा दाखल न करण्याचा सूचना दिल्या. आयुक्तांच्या फोननंतर सर्व अधिकारी अवघ्या दहा मिनीटातच मनपात परतले.गुन्हा दाखल करण्याची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची आयुक्तांना सूचनासूत्रांनी सांगितले की, दुपारी ३ वाजेच्या सुमारास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आयुक्त चंद्रकांत डांगे यांना फोन करून अनंत जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करा अशा सूचना दिल्या. त्यानंतर आयुक्तांनी नगररचना विभागाच्या कर्मचाºयांना शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पुन्हा पाठविले. नगररचना सहाय्यक संचालक अनंत धामणे यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक एच.एम.खान, नगररचना विभाग व अतिक्रमण विभागाचे १५ कर्मचारी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी दाखल झाले.फिर्यादी होण्यास मनपा कर्मचाºयांची टाळाटाळगुन्हा दाखल करण्यासाठी गेल्यानंतर मनपाचा कोणताही कर्मचारी फिर्यादी होण्यास तयार नसल्याचे दिसून आले. नगरचना सहाय्यक संचालक अनंत धामणे यांनी देखील फिर्यादी होण्यास नकार दिला. त्यानंतर एच.एम.खान हे गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादी होण्यास तयार झाले. मात्र, दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास पुन्हा त्यांनी ही नकार दिला.महापालिकेतील आंदोलन म्हणजे केवळ स्टंटबाजी आहे. ही मंडळी एवढे वर्षे सत्तेत होती, त्यावेळी त्यांनी काय केले? आता सत्तांतर होताच कामात अडथळे आणण्याचा प्रकार सुरु केला आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. केवळ प्रसिद्धीसाठी ही स्टंट बाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी मी कुणालाही फोन केला नाही.-गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री.नगररचना विभागाकडून नागरिकांच्या प्रलंबित फाईलींचा निपटारा होत नसल्याने अनंत जोशी यांनी तक्रार केली. त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांनी सोमवारी कुलूप ठोकले. जोशी यांनी कुलूप लावणे चुकीचे होते. यासाठी आयुक्तांना फोन करून जोशी यांच्यावतीने माफी मागितली. मात्र, त्यांनी केवळ हा वाद वाढवायचा होता. म्हणून हा गुन्हा दाखल केला आहे. आयुक्तांनी विसरु नये की भविष्यात गाठ शिवसेनेशी आहे. वेळ आल्यावर शिवसेना स्टाईल दाखविली जाईल.-गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्रीसोमवारी दिवसभर कार्यक्रमांमध्ये व्यस्त होतो, त्यामुळे अनंत जोशी यांच्या प्रकरणाबाबत कोणतीही माहिती नाही. आयुक्तांनी त्यांचे काम केले आहे. आम्ही विकासाचे राजकारण करतो, दबावाचे राजकारण करीत नाही. सेनेच्या नगरसेवकांना पराभव जिव्हारी लागल्याने चुकीचे आरोप त्यांच्यांकडून केले जात आहेत.-सुरेश भोळे, आमदारअनेक महिन्यांपासून नगररचना विभागात भोंगळ कारभार सुरु आहे. सर्वसामान्यांचा बांधकाम परवानगीच्या अनेक फाईली नगररचना विभागात पडून आहेत.त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही.आयुक्तांकडे तक्रारी करुन देखील लक्ष दिले जात नसल्याने नाईलाजास्तव कुलूप लावावे लागले.- अनंत जोशी, गटनेते, शिवसेनाअनंत जोशी यांनी नगररचना विभागाला कुलूप ठोकल्याने त्यांचावर रितसर गुन्हा दाखल केला. दुपारी मनपा नगररचना विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना पाठविले होते. मात्र, दुपारी पोलीस जेवायला गेले असल्याने त्यांनी सायंकाळी बोलाविले होते. त्यामुळे सायंकाळी हा गुन्हा दाखल करण्यात आला.-चंद्रकांत डांगे, आयुक्त

टॅग्स :Jalgaonजळगाव