जळगाव : आचारसंहिता भंगाचा जिल्ह्यातील पहिला गुन्हा सोमवारी जिल्हा पेठ पोलिसात दाखल झाला आहे. शिवसेनेचे नीलेश पाटील, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी व साई मोह क्रिएशन यांच्याविरुध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. मनपाचे किरकोळ विभागाचे लिपीक अजय उध्दव बिºहाडे यांनी फिर्याद दिली आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व राजकीय, संघटनेचे पोस्टर्स, बॅनर, झेंडे, फलक आणि मतदारांवर प्रभाव पडेल अशा सर्व वस्तू हटविण्यात आल्या आहे. दरम्यान, मनपातर्फे आचारसंहितेचा भंग होईल असे फलक काढण्याचे आवाहन विविध राजकीय पक्ष व संघटनांना केले होते.मात्र तरीही शहरातील आकाशवाणी चौकात सामाजिक वनीकरण विभागाच्या हद्दीत त्यांच्या मालकीच्या होर्डींगवर नीलेश पाटील यांचे शिवसेना पक्षाच्या व्यक्तीसोबतचे फोटोंचे होर्डींग कायम आहेत. मनपा किरकोळ वसुली विभागाचे लिपीक बिºहाडे यांच्या फिर्यादीवरून सामाजिक वनिकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी, नीलेश पाटील आणि साईमोह क्रियेशन अॅडव्हर्टायझर यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलिसात लोकप्रतिनिधी नियम कलम १२६ सह महाराष्ट्र विद्रुपीकरण अधिनियम सन १९९५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सामाजिक वनीकरणला दिले होते पत्रआचार संहितेच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनातर्फे समाजिक वनिकरण विभागाला होर्डिंग काढण्याच्या सूचना एका पत्राद्वारे करण्यात आल्या होत्या. या विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्यात विभागीय वनाधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले आहे.
जळगावात शिवसेनेचे नीलेश पाटील यांच्यासह तिघांविरुध्द आचारसंहिताभंगाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:40 PM