शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा; नगराध्यक्षपदी आनंदा पाटील तर उपनगराध्यक्षपदी रेखा गायकवाड यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 1:50 PM

Bodwad Nagar Panchayat : जळगाव - जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची निवड शुक्रवारी पार पडली. त्यात नगराध्यक्षपदी शिवसेनेचे आनंदा पाटील यांची तर उपनगराध्यक्षपदी रेखा गायकवाड यांची निवड झाली आहे.

- प्रशांत भदाणेजळगाव - जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची निवड शुक्रवारी पार पडली. त्यात नगराध्यक्षपदी शिवसेनेचे आनंदा पाटील यांची तर उपनगराध्यक्षपदी रेखा गायकवाड यांची निवड झालीये. नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून, शिवसेनेने आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसनेही या निवडणुकीत नशीब आजमावले. परंतु, त्यांच्या पदरी निराशा आली.

१० विरुद्ध ७ अशी मारली शिवसेनेने मजलनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी शिवसेनेकडून एक तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यात शिवसेनेचे आनंदा पाटील हे निवडून आले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या मतदानात शिवसेनेचा १० तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने ७ मतं पडली.

भाजपने दिला सेनेला पाठिंबामहिनाभरापूर्वी झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत 17 पैकी 9 जागांवर सेनेने विजय मिळवला होता. राष्ट्रवादीच्या वाट्याला 7 तर भाजपला अवघी एक जागा जिंकता आली होती. त्यानंतर आज झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक विजय बडगुजर यांनी सेनेला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेच्या बाजूने 10 मतं पडली.

आमदार चंद्रकांत पाटील ठरले किंगमेकरबोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील किंगमेकर ठरले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना या निवडणुकीत पिछाडीवर सोडलं. यापूर्वी बोदवड नगरपंचायतीवर भाजपचे वर्चस्व होते. तेव्हा एकनाथ खडसे हे भाजपमध्ये होते. खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बोदवडची निवडणूक खडसे यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची होती. मात्र, त्यांना या ठिकाणी करिष्मा करता आला नाही. खडसेंना होमपीचवर हा मोठा धक्का मानला जात आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाeknath khadseएकनाथ खडसेBodwadबोदवड