जळगाव, दि.4- मनसेच्या नगरसेविका मंगला चौधरी यांच्या रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीसाठी मनसेने उमेदवारी द्यायची की भाजपाने याबाबत रविवारी रात्री उशिरार्पयत व सोमवारी दुपार्पयत चर्चेचे गु:हाळ चालूनही तडजोड होऊ शकली नाही. त्यामुळे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या सूचनेनुसार मनसेचे ललित कोल्हे यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्या माजी महापौर आशा कोल्हे यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली असून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अजर्ही दाखल केला. तर भाजपाने तीन जणांना उमेदवारी दिली आहे. त्यापैकी एका उमेदवाराची उमेदवारी निश्चित करण्यात येईल. दरम्यान, माघारीची मुदत 7 एप्रिल असून त्यादिवशीर्पयत निवडणूक बिनविरोधचे प्रय} सुरूच राहणार आहेत.
मनपा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे आशा कोल्हेंची उमेदवारी
By admin | Published: April 04, 2017 11:05 AM
माजी महापौर आशा कोल्हे यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली असून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अजर्ही दाखल केला.
दुपारी आशा कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, स्थायी समिती सभापती वर्षा खडके, नगरसेवक नितीन बरडे, विष्णू भंगाळे, जितेंद्र मुंदडा यांच्यासह मोठय़ा संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.