या माध्यमातून अवजारे बँक स्थापन करीत त्यांनी जिल्ह्यात सर्वप्रथम बीबीएफ पेरणी यंत्रांचा वापर सुरू केला आहे. शेती अवजारांची किंमत लाखोंच्या घरात असल्याने, शेतकरी मिळून अवजार बँक, गटशेती आदी उपक्रम काळाजी गरज आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत पोकरा योजनेच्या अर्थसहाय्याने साठ टक्के अनुदानावर जवळजवळ १३ लाख ३३ हजारात कृषी अवजारे खरेदी व शेड त्यांनी उभारले आहे. यात ट्रॅक्टर, बीबीएफ पेरणी यंत्र, नांगर, टिलर, रोटोव्हेटर, ग्रास कटर, पाॅवरटिलर, फवारणी यंत्र याचा समावेश आहे. गटातील शेतकऱ्यांची कामे आटोपून तालुक्यात इतर शेतकऱ्यांनादेखील ती योग्य दरात भाड्याने दिली जात असल्याने, बैलजोडी, शेतीसाधने नसलेल्या लहान, अल्पभूधारक शेतकऱ्यांची सोय व या शेतकरी गटाला आर्थिक लाभ होत आहे. तालुक्यातील हा क्रियाशील शेतकरी गट आहे.
ट्रँक्टरला जोडण्यात येणाऱ्या बीबीएफ यंत्रांच्या सहाय्याने पेरणी केल्यानंतर बियाणे, वेळ, पैसा याची बचत होतेए उत्पादनात वाढ होते. आतंरमशागतदेखील करता येत असल्याने मजूरटंचाई भासत नाही. रुंद वरंबा व खोल सरी यामुळे अतिपावसाने नुकसान होत नाही. माती वाहून जात नाही. एकरी उत्पादनात वाढ होते. हरभरा, ज्वारी, मका, बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, भुईमुग, कापूस आदी पिकाची पेरणी करता येते.
लोकमत कृषिरत्न पुरस्काराने मिळाले प्रोत्साहन
शेडनेटमधे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ढोबळी मिरची आदी प्रयोगशील शेतीमुळे ‘लोकमत’चा कृषिरत्न पुरस्कार विनोद पाटील यांना मिळालेला आहे. यानंतर उत्साह वाढला. इतर शेतकऱ्यांनादेखील या शेतीयज्ञात सहभागी करुन घेत गट स्थापन केला. शेतीचे यांत्रिकीकरण झाले आहे. एकट्या-दुकट्या शेतकऱ्याला आधुनिक शेतकरी अवजारे घेणे परवडत नाही. यामुळेच तालुका कृषी अधिकारी बी. बी. बोर्डे यांचे मार्गदर्शनाखाली गट मिळून शेतीची संकल्पना पुढे येत या शेतकऱ्यांची उन्नती साधली जात आहे.
भडगाव तालुक्यात २२५ शेतकरी गट व सहा शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत. कृषिविभागाच्या आत्मा, तसेच पोकरा योजनेतून शेडनेट, शेततळे आदी अनुदानातून उभी राहत आहेत. यातून निश्चितच तालुक्यात शेतीत बदल घडत आहेत. हवामान बदलाला शेतकरी सामोरा जात आहे.
-बी. बी. बोर्डे, तालुका कृषि अधिकारी
===Photopath===
300621\30jal_5_30062021_12.jpg
===Caption===
अवजार बँकेतील बीबीएफ पेरणी यंत्रासोबत बी. बी. बोर्डे, विनोद पाटील आदी.