ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 13 - शेतक:याची आर्थिक कोंडी झाली आहे. कजर्माफीचा मुद्दा प्रलंबित आहे. शिवसेना सत्तेत असली तरी कजर्माफीसाठी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची तयारी शिवसेनेची आहे. अशातच जिल्हा बँकेकडून शेतक:यांना कर्ज मिळत नाही, किसान क्रेडीट कार्ड दिले जात आहेत. त्यामुळे या प्रश्नी 30 मे ते 5 जून यादरम्यान मोर्चा काढला जाईल, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. शिवसेनेचा भगवा सप्ताह 30 मे ते 5 जून म्हणजेच अहिल्याबाई होळकर पुण्यतिथीपासून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसार्पयत साजरा केला जाईल. या अंतर्गत शेतक:यांचे प्रश्न ऐरणीवर आणून त्यांच्यासाठी लढा उभारला जाईल. 19 मे रोजी नाशिक येथे शेतकरी अधिवेशनभगवा सप्ताह साजरा करण्यापूर्वी 19 मे रोजी नाशिक येथे शेतकरी अधिवेशन होईल. त्यात जिल्हाभरातील अधिकाधिक शेतक:यांना सहभागी करून घेतले जाईल. या अधिवेशनात सेनेचा कुठलाही नेता भाषण करणार नाही किंवा बोलणार नाही. शेतकरी आपली व्यथा मांडतील. सकाळी 10 ते सायंकाळी 5 र्पयत हे अधिवेशन असेल. शेवटी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपली शेतक:यांचे प्रश्न, कजर्माफी यासंबंधीची आपली भूमिका मांडतील, असेही वाघ यांनी सांगितले.
भगव्या सप्ताहांतर्गत जळगाव जिल्हा बँकेविरूद्ध शिवसेनेचा मोर्चा
By admin | Published: May 13, 2017 6:17 PM