ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 24 - कापसाच्या बोगस बियाण्यांमुळे जिल्ह्यातील 90 टक्के कापसाच्या पिकावर बोंडआळीचा प्रादुर्भाव झाला असून यामुळे शेतक:यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करीत कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने गुरुवारी दुपारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिका:यांच्या दालनात दोन तास ठिय्या आंदोलन केले. या वेळी देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणला होता. अखेर कृषी विभागाच्यावतीने पोलिसांकडे संबंधित कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी फिर्याद दिली. बीटी वाणाच्या वापरामुळे कापसावर बोंडअळीचा प्रादरुभाव होणार नाही, असा कंपन्यांनी सरकारकडे दावा केला होता. मात्र हा दावा खोटा ठरला असून यात कंपन्यांनी शेतक:यांची फसवणूक केली असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. जिल्ह्यात 4 लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे, मात्र यातील 90 कापसावर बोंडअळी असून यामुळे शेतक:यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, ग्राहक संरक्षण जिल्हा संघटक गजानन मालपुरे, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, जि.प. सदस्य पवन सोनवणे, माजी जि.प. उपाध्यक्ष जानकीराम सोनवणे, जळगाव तालुकाप्रमुख नाना सोनवणे, महानगर प्रमुख शरद तायडे, कुलभूषण पाटील, भुसावळ तालुका प्रमुख समाधान महाजन आदी जिल्हा अधीक्षक कृषी अधिका:यांच्या दालनात पोहचले. तेथे त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांच्याकडे आपली मागणी मांडली. मात्र समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे सांगत उपस्थितांनी कार्यालयातच ठिय्या केले. पोलिसात दिली तक्रारतब्बल दोन तास सर्वजण ठिय्या मांडून होते. त्यानंतर अनिल भोकरे यांच्यासह जि.प.चे कृषी अधिकारी मधुकर चौधरी यांनाही तेथे बोलविण्यात आले. जो र्पयत फिर्याद देत नाही तोर्पयत उठणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. अखेर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला, त्यानंतर आंदोलक माघारी परतले.