आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २३ - मुक्ताईनगर तहसील कार्यालयाकडे असलेल्या वीज बिलाच्या थकबाकीपोटी कार्यालयाचा वीज पुरवठा खंडीत केल्यानंतर तहसील कार्यालयानेही वीज केंद्र सील केल्याने सर्वत्र महसूल विभाग व वीज कंपनीत चांगलीच जुंपली आहे. आता जिल्ह्यात वीज केंद्रांना आवश्यक प्रमाणपत्र, जागा सहजा-सहजी देऊ नका, अशा सूचना जिल्हा पातळीवरून तहसीलदारांना देण्यात आल्या असल्याने दोन्ही विभागांमध्ये वाद वाढण्याची चिन्हे आहेत.मुक्ताईनगर तहसीलकार्यालयाकडे वीज बिलाची थकबाकी असल्याने गुुरुवारी वीज कंपनीकडून तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात केला. त्याला प्रतिउत्तर म्हणून काहीच वेळात तहसील कार्यालयाच्यावतीने महसूल वसुलीपोटी वीज केंद्र सील केले.जिल्ह्यात झालेल्या गारपिटीची माहिती संकलीत करणे सुरू असल्याने वीज पुरवठा खंडीत केल्याने या कामासह इतरही कामे खोळंबल्याचे महसूल विभागाचे म्हणणे आहे. वीज कंपनीकडे महसूल वसुलीची थकबाकी असल्याने कंपनीने ताठर भूमिका घेणे चुकीचे असल्याचाही सूर महसूल विभागात उमटत आहे. त्यामुळे आता वीज कंपनीस कोणतेही प्रमाणपत्र, जागा देताना विचार करा व ते थांबून ठेवा, अशा सूचनाच तहसीलदारांना देण्यात आल्या. त्यामुळे आता वसुलीवरून महसूल प्रशासन व वीज कंपनीत चांगलीच जुंपल्याचे चित्र आहे.
जळगाव जिल्ह्यात वीज कंपनीच्या कारवाईला ‘महसूल’चा ‘शॉक’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:58 AM
वसुलीवरून जुंपली
ठळक मुद्देमुक्ताईनगरच्या झळा जिल्ह्यातील वीज उपकेंद्रांनाही बसणारआवश्यक प्रमाणपत्र, जागा सहजा-सहजी देऊ नका