पथराड, ता.धरणगाव : येथे बुधवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान हरियाणा येथील गुन्हा शाखेचे अधिकारी व पाळधी येथील पोलिसांनी संयुक्त धाड टाकून २५ लाखाचे बाटा कंपनीचे बुट व चप्पलचे बॉक्स जप्त केले.ही चोरी हरियाणा राज्यात झाली असुन कंटेनर चालक तयुब याला कंटेनर मधून ९३ लाखांचे चपला व बुटांचे बॉक्स चेन्नई येथे पोहोच करण्यासाठी पाठविले असता त्याने तो माल तेथे न पोहोच करता महाराष्ट्र गाठले. यापैकी २५ लाखाचा माल येथे जप्त केले. दरम्यान, बाटा कंपनीचे डिलर विजयकुमार यांनी कंटेनर मधील ९३ लाखाचे बुट व चप्पल चोरीचा गुन्हा फरिदाबाद येथे दाखल केला होता. आरोपी तयुब उर्फ बदलु (रा.शेरगड) याला अटक केल्यावर हरियाणा पोलिसांनी धरणगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पवन देसले यांच्या मार्गदर्शनात पथराड येथे छापा टाकला. पाळधीचे हनुमंत गायकवाड व अरूण निकुंभ, विजय चौधरी यांनी रात्रीच सर्व माल ट्रकमधे भरुन पाळधी पोलिस स्टेशनला आणून तो हरियाणा पोलिसांच्या ताब्यात दिला. अक्षय पाटीलचा शोध घेतला असता तो पसार झाला. तपास पाळधी पोलिस करत आहे.पाळधीतील अक्षय पसारमाल लंपास करणारा आरोपी तयुब याची जळगाव जिल्ह्यात अक्षय पाटील याच्याशी त्याची भेट झाली. यावेळी अक्षय हा पाळधी येथे मित्राकडे राहात होता. त्याने पाळधीत ओळख करून घेतली होती त्यानंतर पाळधी येथे भाड्याने खोली बघितली. परंतु खोली न मिळाल्याने पथराड येथील अमृत चापे यांच्याशी संपर्क करून तेथे खोली घेतली. यानंतर दुसऱ्या दिवशी पथराड येथे कंटेनरमधील भरलेला माल या खोलीत ठेवला.
२५ लाखांचे बूट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 2:40 PM