मुक्ताईनगर : मतदारसंघातील बोदवड बाजार समिती अंतर्गत बोदवडसह इतर उपबाजार समित्यांमध्ये अत्यल्प ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट आहे.परंतु मतदारसंघात ज्वारी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर असल्याने जोपर्यंत शेतकऱ्यांची पूर्णतः ज्वारी खरेदी होत नाही तोपर्यंत ज्वारी खरेदी केंद्र बंद करण्यात येऊ नये, अशा मागणीचे पत्र आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना २७ रोजी दिले आले.
आमदार पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी पुरवठा विभागामार्फत मतदारसंघातील मुक्ताईनगर तसेच बोदवड व इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एकदम अत्यल्प अतिशय कमी प्रमाणात (२०० क्विंटल) ज्वारी खरेदी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना प्राप्त झाले आहे. परंतु मतदारसंघामध्ये ज्वारी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच ज्वारीचे उत्पन्न जास्त असल्याने जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी होत नाही तोपर्यंत ज्वारी खरेदी केंद्र बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे करण्यात आली आहे.