शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
2
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
3
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
4
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
5
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
6
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
7
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
8
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
9
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
10
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
11
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
12
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
14
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
15
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
16
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
17
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
18
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
19
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
20
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव

दारू दुकानांचे स्थलांतर रखडले

By admin | Published: June 22, 2017 11:09 AM

जिल्हाभरातून 34 अर्ज : 7 जुलैला सुनावणी

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.22 : राज्य मार्ग व राज्य महामार्ग या रस्त्यांच्या मालकीबाबत न्यायालयात खटले दाखल झाल्याने दारु दुकानांच्या स्थलांतराची प्रक्रिया रखडली आहे. आतार्पयत जिल्ह्यात 34 दुकानांचे स्थलांतर करण्याबाबतचे अर्ज राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आलेले आहे. त्यात जळगाव शहरातील आठ दुकानांचा समावेश आहे. दरम्यान, खंडपीठात दाखल याचिकेवर 7 जुलै रोजी एकत्रित सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाला लागून 500 मीटरच्या आत असलेले दारू दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत, मात्र प्रत्यक्षात बंद झालेली ही दुकाने राज्यमार्गावरील असल्याने या दुकानांना सुरू करण्याची परवानगी देण्यासाठी शहरातील 37 दुकानदारांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकेवर 30 मे रोजी न्या.संगीतराव पाटील यांच्या खंडपीठात कामकाज झाले होते. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने जिल्हाधिका:यांना कारणे दाखवा नोटीस काढली होती. 
स्थलांतराबाबत 34 दुकानदारांचे अर्ज सर्वोच्च न्यायालयाचा फटका बसलेल्यांपैकी जिल्ह्यातील 34  दारू दुकानदारांनी स्थलांतरासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज सादर केले आहेत. त्यात जळगाव शहरातील 8 दुकानांचा समावेश आहे. देशी दारू 10, वाईन शॉप 5, परमीट रुम 12 व बियर शॉप 7 असे अर्ज आहेत. रहिवाशी भागात दारू दुकानांना विरोध म्हणून शहरातून 10 ते 12 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस.एल.आढाव यांनी दिली.
खंडपीठात 291 याचिका
याचिकाकत्र्याच्या म्हणण्यानुसार हे दारू दुकाने कोणत्या मार्गावर आहेत, त्याची पडताळणी करावी. राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर हे दुकाने नसतील तर ते सुरू करण्याबाबत आदेश दिला होता. त्यानंतर बांधकाम विभागाने राज्यमार्ग म्हणजे राज्य महामार्ग असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आता 7 जुलै रोजी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. या खंडपीठात 291 याचिका दाखल झाल्या आहेत. खंडपीठाने दारू दुकानांच्या बाजूने निर्णय दिला तर स्थलांतराची प्रक्रिया रद्द होईल, अन्यथा त्यानंतर स्थलांतराचे प्रमाण वाढेल असे सूत्रांनी सांगितले.