जळगाव : लॉकडाउनच्या काळात संचारबंदी व अत्यावश्यक सेवेच्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने उघडण्यास बंदी असतानाही पहाटे पाच वाजता फुले मार्केटमधील क पड्यांचे दुकाने उघडून माल विक्री करणाºया १५ दुकानांना गुरुवारी सील करण्यात आले. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे व मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने भल्यापहाटे ही कारवाई केली आहे. १५ दुकानांसह फुले मार्केटमधील २२ मोटारसायकल व २ चारचाकी वाहनेदेखील जप्त करण्यात आली आहेत.फुले मार्केटमध्ये पहाटे ४ वाजेच्या सुमारास व्यवसाय सुरू केले जात असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांना मिळाली होती. उपायुक्त वाहुळे हे सकाळी ४ वाजता एकटेच पोहचले. त्यानंतर त्यांनी पाहणी केल्यानंतर अनेक दुकाने सुरू असल्याचे आढळून आले. वाहुळे यांनी अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच.एम.खान यांना पथकासह कारवाईसाठी बोलावले. ५.३० वाजेपर्यंत मनपाचे पथक आल्यानंतर मनपा कर्मचाऱ्यांनी एकेक दुकाने सील करण्याची मोहीम हाती घेत, सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण १५ दुकाने सील करण्यात आली.उपायुक्तांनी मनपाचे पथक बोलाविल्यानंतर थेट दुकानांमध्ये जाऊन कारवाई करण्याऐवजी आधी फुले मार्केटमध्ये येणारे व जाणारे सर्व प्रवेशव्दार बंद करण्यात आले. त्यानंतर चार स्वतंत्र पथकांनी ही कारवाई केली. भल्या पहाटे फुले मार्केटमधील कपड्यांच्या दुकानातील बराचशा माल जिल्ह्यातील काही व्यापाºयांना विक्री केला जात होता. तर काही ग्राहकदेखील दाखल झाले होते.सकाळी ४ ते ९ पर्यंत सुरू होता व्यवसायलॉकडाउन झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. मात्र, काही दुकानदारांनी मनपा, पोलीस व जिल्हा प्रशासनाला चुकवत आपले व्यवसाय सुरू केले आहेत. फुले मार्केटमध्ये सकाळी ४ ते सकाळी ९ वाजेपर्यंत दुकाने उघडून व्यवसाय केला जात होता. तर अनेक विक्रेते आपला माल घरीच घेऊन जातात व त्या ठिकाणाहून आपला व्यवसाय करत असतात. विशेष म्हणजे एवढ्या भल्यापहाटे दुकाने उघडल्यानंतर ग्राहकदेखील गर्दी करत असतात.या दुकानदारांवर झाली कारवाईधीरज गेही, दिनदयाल गेही, विमल आहुजा, वरूण मेहता, विजय भिकन पाटील, हेमंत मोतीरामाणी, अकबर शकिल पटेल, दिनेश वरयानी, महेश भावनानी, दिनेश पाटील, अमोल महाजन, हिरालाल कटारिया, विक्की बालाणी, पवनकुमार बालणी, रवींद्र पारिस्कर, अमित सटाणा, प्रकाश सटाणा, राहुल चौधरी या दुकानदारांच्या मालकीची दुकाने सील करण्यात आली.
पहाटे पाच वाजता दुकाने उघडून माल विक्री करणाऱ्या १५ विक्रेत्यांची दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:51 PM