जळगाव : शासनाने रोटेशन पद्धतीने दुकान उघडण्यास परवानगी दिल्याने अनेकांच्या जिवात जीव आला. मात्र, अत्यंत अडचणीत असलेल्या मॉल्स व शॉपिंग कॉम्पलेक्समधील व्यापाऱ्यांनाही दुकाने सुरू करण्यासाठी शासनाने आदेश काढावेत, अशी मागणी जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.पत्रात म्हटले आहे की, कोरोनामुळे केवळ मार्केट नव्हे तर सर्व व्यापारी बांधवांचे आयुष्यचं लॉकडाऊनसारखे झाले आहे. जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ ही ४० हजार व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारी संस्था आहे. सततच्या तेजी-मंदीमुळे व्यापारी आधीच चिंताग्रस्त जीवन जगत असतांना, लॉकडाऊनमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठा हातभार लावणाºया व्यापारीवर्गाचे जिणे अत्यवस्थ झाले आहे.वाढत्या कोरोना संसर्गचा कठीण काळ असल्यानेच शासनाच्या आवाहनाला सहकार्य करून, व्यापारी बांधवांनी ८० दिवसांपासून व्यापार बंद ठेऊन घरी बसले आहेत.मात्र, आता शासनाने टप्प्याटप्प्याने दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याने व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तरी इतर व्यावसायिकांप्रमाणे मॉल्स व शॉपिंग कॉम्पलेक्समधील व्यापाºयांनाही दुकाने सुरू करण्यासाठी शासनाने आदेश काढावेत, शासनाच्या सुचनेनुसार व्यापारी बांधव व्यवसाय करतील, अशी मागणी पत्राद्वारे जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललित बरडिया आदींनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केलीआहे.व्यापाºयांच्या व्यथा व वेदना शब्दांपलिकडेरोटेशन पद्धतीने दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याने अनेक व्यावसायिकांना खºया अर्थाने दिलासा मिळाला आहे. मात्र, मॉल्स आणि शॉपिंग कॉम्पलेक्समधील दुकाने सुरू करण्याबाबत शासनाने कुठलाही निर्णय न घेतल्याने व्यापाºयांच्या व्यथा व वेदना या शब्दांपलिकडे असल्याचे या पत्रात म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा एकदा पोटतिडकीने विनंती करून मॉल्स व शॉपिंग कॉम्पलेक्समधील दुकाने सुरू करण्याची मागणी केली आहे.
शॉपिंग कॉम्लेक्स, मॉलमधील दुकाने सुरू करण्याला परवानगी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 11:58 AM