Video: "अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावं का"? रोहित पवारांनी गोलगोल फिरवत उत्तर टाळलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 04:09 PM2023-09-05T16:09:22+5:302023-09-05T16:10:09+5:30

बारामतीमध्ये एक मराठा, लाख मराठा, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, च्या घोषणा देत सकल मराठा समाजाच्यावतीने शहरात मोर्चा काढण्यात आला.

"Should Ajit Pawar get out of power"? Rohit Pawar evaded the answer by going round and round | Video: "अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावं का"? रोहित पवारांनी गोलगोल फिरवत उत्तर टाळलं

Video: "अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावं का"? रोहित पवारांनी गोलगोल फिरवत उत्तर टाळलं

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रवादीतील बंडखोर नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील सकल मराठा समाजाच्यावतीने जालना येथील मराठा आंदोलकावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, बारामतीमधील या मोर्चात अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावे, अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्यावरुन, आमदार रोहित पवार यांना जळगावमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, रोहित पवार यांनी या प्रश्नावर उत्तर देणं गोलगोल टाळलं.  

बारामतीमध्ये एक मराठा, लाख मराठा, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, च्या घोषणा देत सकल मराठा समाजाच्यावतीने शहरात मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, लाठीचार्ज करणाऱ्य पोलिसांवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे. यावेळी, सरकारचा भरलाय घडा अजित पवार सरकारच्या बाहेर पडा अशा घोषणांनी बारामतीचा मोर्चा दणाणून गेला होता. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावं का? मराठा नेते आणि बारामतीकर म्हणून तुम्हाला काय वाटतं?. मात्र, या प्रश्नावर त्यांनी शाब्दिकरित्या गोलगोल फिरवत उत्तर देणं टाळल.



तिथल्या घोषणा व्यक्तीगत होत्या, तिथले लोकप्रतिनीधी अजित दादा आहेत. ही त्यांच्या मतदारसंघातील भूमिका आहे, त्यामुळे यावर मी काही बोलू शकणार नाही. जे काही बोलायचंय ते दादा बोलतील, असे म्हणत रोहित पवार यांनी उत्तर देणं टाळलं. त्यानंतर, पत्रकाराने पुन्हा हाच प्रश्न विचारला. पण, त्यांनी जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेधे म्हणत, ही सरकारची हेकेशाही असल्याचे सांगत उत्तर देणं टाळलं. तसेच, राजकीय दृष्टीकोनातून मी यावर काही म्हणणार नाही, असे गोलगोल फिरत रोहित पवारांनी उत्तर दिले.  

दरम्यान, या संदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, मी काटेवाडीच्या सरपंचांना फोन केला होता. ते म्हणाले कोणीतरी ेकजण होता. मात्र, त्याच्या मागणीला एवढी किंमत देण्यात अर्थ नाही. कारण, तो कोणी लोकप्रतिनिधी नाही, किंवा कोणी मोठा नेता नाही, असे उत्तर अजित पवार यांनी दिलं होतं. 

Web Title: "Should Ajit Pawar get out of power"? Rohit Pawar evaded the answer by going round and round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.