साधावया भक्ती काज । नाही लाज धरितऐसी यासी शरण जावे । शक्ती जीवे न वंचीभिष्मापण केला खरा । धनुर्धरा राशीलेतुका म्हणे साक्ष हाती । तो म्या चित्ती धरिलाया अभंगात तुकाराम महाराज भगवंताच्या भक्तीचे महात्म्य सांगतात.भगवंत आपल्या भक्ताच्या कार्यासाठी कधीच लाज धरीत नाही म्हणून आपण त्यास शरण जावून आपली शक्ती त्यांच्या पायावर अर्पण करावी ती इतरत्र वाया घालू नये. यासाठी तुकाराम महाराज भिष्मांचे उदाहरण देवून सांगतात की, एकीकडे अर्जुनाला पण वाचवले व दुसरीकडे भिष्मांची प्रतिज्ञा पूर्ण केली. चोखोबा वारीला गेले. पण पत्नीच्या बाळंतपणासाठी ते बहिणीला पाठवायचे विसरले. मग इकडे वेदना सुरू झाल्या आणि मग तोे चोखोबाची बहीण झाला शारंगधर वहिनी उघडा दार हाका मारी....अक्षरश: महिनाभर चोखोबांच्या पण बाळंतपणापासून ते सर्व सेवा केली ती एकरूप होवूनच. असा हा देव भक्तासाठी झाला व कार्य केले. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की देव लाज धरीत नाही.साधावया भक्तीकाजनाही लाज धरित ...दुसरे उदाहरण म्हणजे अर्जुनासाठी सुभद्रा झाला. नंतर प्रल्हादासाठी नरसिंह, ब्रह्मासाठी वराह रुप असे अनेक उदाहरण सांगता येतील. सर्वांची भक्तीपण तशीच होती. म्हणून ‘ऐसा भक्ताचा अंकित’ आहे. पांडुरंगाला माझ्या अंत:करणात धरीले.तुकाराम महाराज सांगतात की, विठ्ठल हा भक्ताच्या कार्यासाठी लाज धरत नाही. पण त्यासाठी भक्त ही कसा असावा.भक्त ऐसे जाणा जे देही उदास... एकदा पंढरीच्या वारीचे दिवस आले आणि चोखोबा वारीसाठी तळमळ करू लागणे. पण घरी पत्नी गर्भवती मग काय करावे. वारी चुकायला नकोशेवटी पत्नी म्हणाली, ‘रस्त्यात तुमच्या बहिणीचे घर लागते, त्यांना द्या की माझ्याकडे पाठवून आणि आपण जा वारीला, वारी नका चुकवू ’ त्यासाठी आपण त्याला शरण गेले पाहिजे. लाखो वारकरी जेव्हा वारीत ‘ज्ञानबा तुकाराम’ या जयघोष करत चालतात तेव्हा त्यांची चिंता तोच हरण करतो.-मनोज महाराज कुलकर्णी, पिंप्राळा.
ऐसी यासी शरण जावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:21 PM