चाळीसगाव : माहिती अधिकार अंतर्गत मागितलेली माहिती न दिल्यामुळे येथील आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूलचे तत्कालीन मुख्याध्यापक व जळगाव येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई का करु नये ? अशा आशयाची नोटीस राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाने बजावली आहे.आरटीआय कार्यकर्ता नारायण जेठवाणी यांनी आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूलचे मुख्याध्यापकांकडे माहितीचा अधिकार अंतर्गत ११ जुलै २०१६ रोजी जानेवारी २०१५ ते जून २०१५ या कालवधीतील मस्टर रोल व वेतन देयके संंबंधी माहिती मागितली होती. ही माहिती व्यक्तीगत स्वरुपाची असल्याने देता येणार नाही, असे सांगून मुख्याध्यापकांनी जेठवाणी यांना माहिती देता येत नाही, असे कळवले होते. त्यानंतर जेठवाणी यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाºयांकडे प्रथम अपील दाखल केले होते. त्यांच्याकडूनही माहिती न मिळाल्याने त्यांनी नाशिक खंडपीठात दाद मागितली. माहिती आयुक्त के.एल. विष्णोई यांनी शिस्त भंगाची कारवाई का करु नये?, अशी नोटीस बजावत या बाबत लेखी खुलासा १५ दिवसात आयोगाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 12:03 AM