ठळक मुद्देसरकारला सुबुद्धीसाठी प्रार्थनानिवेदनात निषेध आणि विविध मागण्या
जळगाव- नोटबंदीच्या वर्षपूर्तीस 8 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भारतीय अर्थव्यवस्थेचा काळा दिन व फसव्या नोटबंदीचे वर्षश्राद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले.भाजपा सरकारने सामान्य जनेतला वठीस धरुन 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी लादून भयंकर दुष्परिणाम देशाला दिले. अजूनही या दुष्परिणामातून देश सावरला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरकारच्या निषेधार्थ वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आमदार तथा पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांचे मुख्य उपस्थितीत सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केला. यावेळी जिल्हा समन्वयक विकास पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील तसेच विलास भाऊलाल पाटील, बाल्मिक पाटील, आबा कापसे, वाय. एस. महाजन, पराग पाटील, नामेदव चौधरी, उज्ज्वल पाटील, जयप्रकाश महाडीक, मिनल पाटील, लिना चौधरी, मंगला पाटील, सविता बोरसे, नगरसेविका लता मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सतीश पाटील यांनी सरकारच्या कारभारावर टिका केली. शेतक:यांना कजर्माफी नावाल घोषित केली असून त्याचा लाभ लवकरात लवकर आणि सरसकट द्यावा अशी मागणी करीत नोटबंदीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले अने क्षेत्रात मंदी आली असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारला सुबुद्धीसाठी प्रार्थनाश्राद्धादरम्यान सरकारला देव सुबुद्धी देवो अशी प्रार्थनाही करण्यात आली. सरकारने लोकांचे व शेतक:यांचे प्रश्न गंभीरतेने घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन नोटबंदी काळात या निर्णयाच्या फटक्यामुळे मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजलीही वाहिली.निवेदनात निषेध आणि विविध मागण्यावर्षश्राद्ध कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी यांना निषेध व विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.1) शेतकरी कजर्माफी योजना फसवी असून सरसकट कजर्माफी करावी. 2) धान्य, सोयबान, तूर आदी शेतमालाची खरेदी किमान आधारभूत भाव देवून करावी तसेच किमान 500 रुपये बोनस द्यावा. पिकांच जेथे निकसन झाले तेथे दुष्काळ जाहीर करावा. 3) वीज पुरवठा नियमीत करावा 4) छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाबाबत तातडीने कार्यवाही करावी 5) महिला, बालक तसेच अल्पसंख्यांक व मागासवर्गीयांवर अत्याचार वाढे असून गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही. याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात. 6) शिवसेना व भाजपा सरकारने आश्वासनानुसार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन द्यावे. नोटबंदीच्या वर्षपूर्तीला श्राद्ध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 1:26 PM