लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव- जी़एच़रायसोनी इन्स्टीट्युट आॅफ बिझनेस मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर एमबीएसोबत जीएसटी प्रमाणपत्र अभ्यासक्रमात (कोर्स) प्रवेश घेतलेल्या श्रध्दा चावला व मुस्कान मंधान यांनी विद्यापीठातून प्रथम क्रमांक पटाविला आहे़ तर द्वितीय क्रमांक सकीना तरवारी हिने मिळविला आहे.रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी श्रध्दा चावला व मुस्कान मंधान यांनी जीएसटी कोर्समध्ये ८९़४० टक्के गुण तर सकीना तरवारी हिने ८९़३० टक्के गुण मिळविले आहे़ एकूण निकालात रायसोनी महाविद्यालयाचा ८५ टक्के निकाल लागला असून एकूण विद्यार्थ्यांपैकी १६ विद्यार्थी विशेष प्राविण्य तर ३० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत. कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नव्याने सुरु झालेल्या अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेऊन शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत हा प्रमाणपत्र कोर्स देखील महाविद्यालयात सुरु करण्यात आला आहे. तसेच पहिल्याच वर्षी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद देऊन घवघवीत यश मिळाल्याचा अधिक आनंद झाला असल्याचे मत संचालिका डॉ.प्रिती अग्रवाल यांनी व्यक्त केले.यांचे लाभले मार्गदर्शनया अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयाला वेळोवेळी सीए पल्लवी मयूर, सीए दर्शन जैन, सीए स्मिता बाफना, सीए अजय ललवाणी, सीए जयेश ललवाणी, सीए देवेश खिवसरा या तज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
जीएसटी कोर्समध्ये श्रध्दा चावला, मुस्कान मंधान विद्याठातून प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 7:37 PM