शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

श्री चक्रधर स्वामी यांच्या शिकवणुकीचे आचरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 4:14 PM

यावल येथे महानुभाव पंथीयांची धर्म परिषद उत्साहात

ठळक मुद्देमनुष्य जन्मास आल्यानंतर कसे आचरण ठेवावे यासंदर्भात श्री चक्रधर स्वामींनी दिलेल्या शिकवणुकीप्रमाणे मनुष्याने त्यांची शिकवण आचरणात आणावीजीवनात प्रत्येकांने स्वामींची शिकवणूक आचरपणात आणावीश्रीमद् भगवतगीतेचे पारायण व धर्मध्वजारोहनानंतर झाली धर्मसभा

यावल, जि.जळगाव : महानुभाव पंथाचे श्री चक्रधरस्वामी अवतार दिनानिमित्ताने येथील फैजपूर रोडवरील जुन्या आॅईल मीलमध्ये मंगळवारी धर्मसभा घेण्यात आली. पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम झाले.धर्मपरिषदेस राज्यातून धर्मगुरूंनी येथे हजेरी लावली. सभेच्या अध्यक्षस्थानी आचार्य साळकर बाबा होते, तर कार्याध्यक्ष राजधर बाबा मराठे होते.याप्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे यांनी सांगितले की, मनुष्य जन्मास आल्यानंतर कसे आचरण ठेवावे यासंदर्भात श्री चक्रधर स्वामींनी दिलेल्या शिकवणुकीप्रमाणे मनुष्याने त्यांची शिकवण आचरणात आणली तर निश्चितच मनुष्याचे जीवन आनंदमयी होते. धर्मपरिषदेच्या निमित्ताने असो अथवा कोणत्याही हिंदू धर्मातील मेळाव्यात असो त्या-त्या पंथांचे संत-महात्मे नेहमी माणसांना धर्मसंस्काराचा मार्ग दर्शवित असल्याने त्यांचे विचार मानवी जीवणास निश्चित वळण देत असतात.सभेचे अध्यक्ष आचार्य साळकर बाबा यांनी सांगितले की, श्री चक्रधर स्वामींनी विश्वबंधुत्व, स्त्रीमुक्ती, स्त्री शिक्षण यासाठी सुमारे ८०० वर्षांपूर्वीच क्रांती केली. त्यांनी संपूर्ण आयुष्य विश्वशांतीसाठी वेचले, असे सांगत प्रत्येकांने स्वामींची शिकवणूक आचरपणात आणावी, असे आवाहन केले.पहाटे श्रीचे मंगलस्नान करण्यात येऊन श्रीमद् भगवतगीतेचे पारायण व धर्मध्वजारोहनानंतर धर्मसभा घेण्यात आली. याआधी शहरातून शाभायात्रा काढण्यात आली.परिषदेस यावलच्या नगराध्यक्षा सुरेखा कोळी, बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, नगरसेवक राकेश कोलते, डॉ. कुंदन फेगडे, अतुल पाटील, पौर्णिमा फालक, देवयानी महाजन यांच्यासह पंथाचे विश्वनाथबाबा लासूरकर, महंत वाघोडेकरबाबा, कानेराजबाबा, नीलेश बिडकर, कृष्णराज पाचराउत, आचार्य सुरेश मानेकरबाबा यांच्यासह राज्यभरातून संत, महंत, भिक्षुक, वासणिक यांच्यासह जिल्हाभरातून पंथबंधू उपस्थित होते. सूत्रसंचालन मधुशास्त्री मराठे, यांनी केले. यशस्वितेसाठी सचिना कासार, वासुदेव जावळे, राजू फालक, प्रशांत साळी, देवसिंग पाटील, योगेश बारी, वासुदेव महाजन, सुमीत साळी, दीपक पाटील यांच्यासह युवावर्गाने परिश्रम घेतले. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमYawalयावल