धरणगाव : जिनींग उद्योजकांनी गणेश चतुर्थीच्या शुभ मूहूर्तावर कापूस खरेदीचा ‘श्री गणेशा’ केला. त्यात सर्वाधिक कापूस खरेदीचा मान येथील श्री जीजिनींग अॅण्ड प्रेसिंग ने मिळविला. त्यांनी ५ हजार ८५३ रुपये प्रति क्विंटल भाव देवून ३ हजार पाचशे क्विंटल कापूस खरेदी केला. तर पिप्री खुर्द शिवारात असलेल्या जोगेश्वरी जिनींग अॅण्ड प्रेसींग ने शेतकºयांना मुहूर्ताचा भाव ५ हजार ९२५ रु.प्रति क्विंटल देवून या सिझनचा सर्वाधिक भाव देण्याचा मान मिळवला. त्यांनी या भावात २ हजार पाचशे क्विंटल कापूस खरेदी केला. तसेच महावीर फायबर जिनींग ने ५ हजार ८९९ प्रति क्विंटल भाव देवून अल्प खरेदी करीत मूहूर्त साधला.श्री जी जिनींग मध्ये जिनींग चे संचालक नयन गुजराथी, संचालक सुरेश चौधरी, संचालक जिवनसिंह बयस, संचालक सी.ए.सागर कर्वा, प्रवेश सराफ यांच्या हाताने विधीवत पूजा करुन काटा पूजन करण्यात आले. शेतकºयांना मुहूर्ताचा भाव प्रति क्विंटल ५ हजार ८५३ रुपये देवून ३ हजार ५०० क्विंटल कापूस खरेदी केला.शेतकºयांना व व्यापाºयांना महाप्रसादाचा लाभ दिला.पिप्री शिवारातील जोगेश्वरी जिनींग अॅण्ड प्रेसिंग मध्ये संचालक राजेश भाटीया, धवल भाटीया, प्रतिक भाटीया यांच्या हस्ते पूजा करुन काटा पूजन करण्यात आले.यावेळी मुहूर्ताचा सर्वाधिक भाव ५ हजार ९२५ रु.प्रति क्विटंल देवून २ हजार ५०० क्विंटल कापूस खरेदी केला.शेतकºयांना व व्यापाºयांना महाप्रसादाचा लाभ दिला.महावीर फायबर जिनींग अॅण्ड प्रेसिंग चे संचालक सुभाष पाटील पळासखेडेकर यांनी काटा पूजन केले.त्यांनी ५ हजार ८९९ रु.प्रति क्विंटल भाव देवून पूजेसाठी फक्त ५० क्विंटल कापूस खरेदी केला.त्याच प्रमाणे इतर जिनींग उद्योजकांनीही मूहूर्त साधून काटा पूजन करुन घेतले.
धरणगावला कापूस खरेदीचा ‘श्री गणेशा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 10:03 PM
जिनींग उद्योजकांनी गणेश चतुर्थीच्या शुभ मूहूर्तावर कापूस खरेदीचा ‘श्री गणेशा’ केला. त्यात सर्वाधिक कापूस खरेदीचा मान येथील श्री जीजिनींग अॅण्ड प्रेसिंग ने मिळविला. त्यांनी ५ हजार ८५३ रुपये प्रति क्विंटल भाव देवून ३ हजार पाचशे क्विंटल कापूस खरेदी केला.
ठळक मुद्देसर्वाधिक खरेदी श्री जी जिनींग मध्येसर्वाधिक भाव जोगेश्वरी जिनींग मध्येनिर्यातदारांसह परप्रांतीय व्यापाऱ्यांची उपस्थिती