किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : श्री दत्तजयंतीनिमित्ताने रविवारी श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.श्री क्षेत्र माहूरच्या दत्त शिखरावर १२ वर्षे तपोसाधना केलेल्या सद्गुरू श्री सच्चिदानंद स्वामी महाराजांनी त्यांना साक्षात मलंग स्वरूपातील श्री दत्तप्रभुंनी कृपाप्रसाद म्हणून दिलेल्या त्यांच्या निर्गुण पादुका व पांढऱ्या रंगाचे निशाण घेऊन येथील पावन भूमीत नाला परिसरात साक्षात श्री क्षेत्र गाणगापूर सुस्वरूप श्री दत्तक्षेत्र उभारले असून, या पावन भूमीत नवचैतन्याला मोहोर आणण्यासाठी संजीवन समाधी घेतलेल्या श्री दत्तस्वरूप सच्चिदानंद स्वामींनी श्री दत्तजयंतीनिमित्ताने मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेला रूढ केलेल्या ‘श्रीकृष्ण-दत्त’ रथोत्सवाला सुमारे १७९ वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे.या धार्मिक उत्सवाला शहरवासीयांसह खान्देश तथा निमाड प्रांतातील श्री दत्तभक्त परिवाराचा वर्षानुुवर्षांपासून मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता, शहर व परिसरातील देशभरात, परदेशात नोकरी वा व्यवसायानिमित्त विखुरलेल्या रावेरकरांचे तथा सासरी गेलेल्या माहेरवाशीणांचे पाय आपसूकच रावेरकडे वळत असल्याने या नगरोत्सवाला एक यात्रोत्सवाचे उधाण आले आहे.रावेर शहराच्या पावन नाला भागात सुमारे २०७ वर्षांपूर्वी साक्षात श्री दत्तस्वरूप सद्गुरू श्री स्वामी सच्चिदानंद स्वामी महाराजांनी त्यांच्या पद पावनस्पर्शाने बस्तान मांडून उभारलेल्या श्री दत्तमंदिराला मूर्र्त स्वरूप आले असून, शहरवासीयांसह तालुका तथा खान्देश व निमाड प्रांतातील लाखो दत्त भक्तांचे असीम श्रद्धास्थान ठरले आहे.त्यासंबंधीची आख्यायिका सांगितली जाते की, माहूरनिवासी सद्गुरूश्री स्वामी सच्चिदानंद स्वामी महाराजांनी बालपणानंतर वैराग्य पत्करून नांदेड येथील गुरू परमसंत हरीदास महाराज यांच्या आज्ञेनुसार श्री दत्तशिखरावर १२ वर्षे अखंड तपोसाधना केली. त्यांना साक्षात श्री दत्तप्रभुंनी मलंग स्वरूपात दर्शन देत त्यांच्या निर्गुण पादुका व पांढरे निशाण तथा एक छडी जणूकाही मोक्षप्राप्तीचा कृपाप्रसाद म्हणून प्रदान केली होती. संत एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी अशाच मलंग स्वरूपात श्री दत्तप्रभुंचे दर्शन घडवल्याचे साम्य आढळून येत असल्याने ते समकालीन संत असावेत असा भक्तगणांचा मानस आहे.दरम्यान, श्री स्वामी सच्चिदानंद महाराजांनी तीन नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्यानंतर खंडवा येथे श्री विठ्ठल मंदिराची उभारणी केली.बºहाणपूर येथील सुर्यकन्या तापीच्या पावनस्नानाची त्यांना ओढ लागल्याने ते बºहाणपूरात दाखल झाले. त्यादरम्यान रावेरहून बºहाणपुरात जाणाºया सुपडूशेठ वाणी, लक्ष्मणदास अग्रवाल, त्र्यंबकशेठ वाणी, शेषाद्रीबुवा या व्यापारीबांधवांना त्यांच्या देवत्वाची चाहूल लागल्याने रावेरला आणण्यासाठी ही मंडळी त्यांच्या चरणी लागली. या व्यापारी भक्त मंडळीने श्रीमंतीच्या वैभवात पाठवलेली खिल्लारी बैलांच्या जोडीवरील सजलेली दमनी श्री स्वामी महाराजांनी परत पाठवली किंबहुना त्यापलीकडे जाऊन त्यांनी त्या दमन्यांचा जत्था रावेरात पोहोचण्यापूर्वीच बºहाणपूर रोडवरील मारूतीजवळ आपले आगमन झाल्याची प्रचिती अनुभवल्याने साक्षात श्री दत्तप्रभू रावेरनगरीत प्रकटल्याची सार्थ भावना शहरवासीयांचे मनात रुंजी घालत होती.सुमारे १८२० च्या सुमारास श्री स्वामी सच्चिदानंद महाराजांनी तत्कालीन रावेर गावाच्या बाहेर असलेल्या नाल्याच्या काठी निर्जनस्थळी बस्तान उभारत कुॅवरस्वामी महाराज, मस्तानशाहवली बाबा यांच्या सत्संगात दैवी अनुभूती घडवत साक्षात दत्तप्रभु असल्याची प्रचिती घडल्याने भक्तांची मोठी मांदियाळी त्याठिकाणी फुलू लागली. दरम्यान, ब्रिटिशांनी मोडीत काढलेल्या एका मुघलकालीन किल्ल्याचा लाकडी इमला वापरून १८३५ च्या सुमारास श्री दत्त मंदिराची उभारणी करण्यात आली.दरम्यान, स्वामींनी एका कासाराला पंचधातूचे प्रमाण व दृष्टांत घडवत एकमुखी दत्तप्रभुंची १७ इंच उंचीची मूर्ती घडवून प्रतिष्ठापना केली.दरम्यान, श्री सद्गुरू श्री दत्तात्रयांचे चिरंतन नामस्मरण होत राहो म्हणून सद्गुरू स्वामी सच्चिदानंद महाराजांनी श्री दत्तप्रभुंच्या सेवेत समर्पित होऊन मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा शके १७६० विक्रमसंवत १८९५ सन १८३८ ला श्री दत्तजयंतीचे औचित्य साधून श्रीकृष्ण-दत्त रथोत्सवाची गुरूपरंपरा रूढ केली. ‘हाथी घोडा पालखी, जय कन्हैयालाल की’, ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या नामस्मरणात गतीमान झालेली रथोत्सवाची चक्र आज १८१व्या वषीर्ही अविरतपणे गतिमान होत असल्याची प्रदीर्घ परंपरा आहे.श्री दत्तस्वामींनी आरंभ केलेल्या रथानंतर त्यांचे शिष्य रामबाई बेटावदकर यांनी साधारण २१ फुट उंच असलेला अष्टमुखी व सुमारे सात ते आठ टन वजनाचा नवीन उंच व भव्य रथ समर्पित केल्याने आरंभीचा छोटा रथ दुसखेडा येथे दिला होता. दरम्यान या नवीन रथाला लागलेले पोलादी पट्टा, पोलादी चाके, पोलादी आखा, लोखंडी नटबोल्ट इतर सर्व साहित्य बोहरा समाजातील एका भक्ताने दान म्हणून समर्पित केले होते.श्री सद्गुरू स्वामी सच्चिदानंद महाराजांनी वयाच्या १०८ व्या वर्षी भाद्रपद शु नवमीला सन १८८८ मध्ये श्री दत्त मंदिरातच संजीवन समाधी घेतली आहे. त्यांच्या परंपरेत दुसरे गादीपती म्हणून माधवनाथ महाराज, तिसरे गादीपती म्हणून केशवदास महाराज, चौथे गादीपती म्हणून भानुदास महाराज तर पाचवे गादीपती म्हणून श्रीपाद महाराज सेवारत आहेत. रथावरील श्रीकृष्ण मूर्ती व श्री दत्त प्रभूच्या निर्गुण पादुकांचे सुपूजन व सेवा बजावण्याची परंपरा राजगुरू परिवार बजावत असून, रामचंद्र राजगुरू, विकास राजगुरू, धनंजय राजगुरू, विशाल राजगुरू सेवा बजावत आहेत. रथाला मोगरी लावण्यासाठी कासार, लोहार व बारी समाजाची परंपरा असून कैलास कासार, भुषण कासार, नीलेश बारी, मुकेश बारी, तर मशाल लावण्यासाठी नाभिक समाजाची परंपरा असून, चौधरी हे सेवा बजावत आहेत.श्री दत्तप्रभुंच्या रथावर भगवान श्रीकृष्ण अवतरतात!श्री सच्चिदानंद स्वामी महाराज एकदा मंदिरात ध्यानस्थ बसले असताना त्यांनी अपने मंदिरमे गोपालजी पदार रहे है.. असे ब्रम्हवचन केले, त्यासंबंधी समोरच्या भक्तांना कोणताही अन्वयार्थ कळला नाही. मात्र, काही वेळेतच खरगोन (मध्य प्रदेश) येथील रायरीकर परिवारातील एक भक्त आपल्या बैलगाडीने मंदिरासमोर काळ्या पाषाणातील मूर्ती घेऊन दाखल झाले. स्वामी सच्चिदानंद महाराजांनी अंगणी जावून भगवान श्रीकृष्णांचे स्वागत केले व श्रीकृष्णाची मूर्ती श्री दत्तमंदिरात स्थानापन्न केली. त्यावेळी रायरीकरांना मूर्ती आणण्याचे कारण विचारले असता, साक्षात भगवान श्रीकृष्णाने गेल्या सप्ताहापासून रात्री स्वप्नात मला रावेरला सच्चिदानंद महाराजांकडे घेऊन चल.. असा दृष्टांत दिल्याने मी ही भगवंताची मूर्ती आणल्याचे स्पष्ट केले. भगवान श्रीकृष्णाचे हे स्वयंअवतरण्याने श्री दत्तप्रभुंच्या रथोत्सवातून दर्शन घडावे म्हणून श्री दत्तप्रभुंच्या निर्गुण पादुकांसह भगवान श्रीकृष्णाची काळ्या पाषाणातील मूर्ती रथावर आरूढ केली जाते. या गोपीकावल्लभाच्या दिव्यानुभूतीनेचं की काय.. चितोडे वाणी समाजातील विवाहेच्छूक युवक युवती आपल्या पसंतीच्या वरवधुची या रथोत्सवाच्या फुललेल्या मांदियाळीतून निवड करीत असल्याची दीर्घ परंपरा आहे. तद्वतच, या मंदिरात एका कासाराच्या घराच्या पुरातन भिंतीतून सुमारे १२०० वर्षांपूर्वीचा शिलालेख असलेली कुलस्वामिनी रेणुकामातेची काळ्या पाषाणातील कोरीव व रेखीव मुर्ती आढळून आल्याने त्यांनी मंदिरात प्रदान केली आहे.
रावेरला श्री दत्तजयंतीनिमित्ताने रविवारी श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 3:58 PM
श्री दत्तजयंतीनिमित्ताने रविवारी श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देउत्सव : देश-परदेशात विखुरलेल्या रावेरकरांचे पाय वळले धार्मिक नगरोत्सवाकडेश्री दत्तप्रभुंच्या रथावर भगवान श्रीकृष्ण अवतरतात!भगवान श्रीकृष्णाच्या स्वयंअवतरण्याने श्री दत्तप्रभुंच्या रथोत्सवातून दर्शन घडावे म्हणून श्री दत्तप्रभुंच्या निर्गुण पादुकांसह भगवान श्रीकृष्णाची काळ्या पाषाणातील मूर्ती रथावर आरूढ केली जाते.