श्री नारायण बुवा रुद्र यांचे सद्गुरू आळंदीचे स्वामी श्री सद्गुरू नृसिंह सरस्वती महाराज होत. त्यांनी ‘स्वात्मसौख्य’ नामक ग्रंथ लिहिला. स्वामी महाराजांनी या त्रिखंडात्मक ग्रंथाचा श्री नारायण बुवा रुद्र यांना उपदेश केला. यामागे सांप्रदायिकांचे कल्याण व्हावे ही प्रमुख दृष्टी होती. या ग्रंथामुळे संप्रदाय वृद्धीच्या दिशेने प्रय} होण्याची आकांक्षा स्वामींच्या मनात होती. या आशेने स्वामी महाराजांनी आपल्या संप्रदायातील जनांच्या कल्याणासाठी हा ग्रंथ रुद्र बुवा महाराजांच्या स्वाधीन केला. श्री बुवा महाराजांनी या ग्रंथाचा आपल्या शिष्यांना उपदेश केला. ग्रंथाचे पावित्र्य आणि संप्रदाय विचाराची मर्यादा ध्यानी घेऊन स्वहस्ते लिहून काढला. या ओवीबद्ध ग्रंथांची ओवीसंख्या अशी आहे. कर्मकांड ओवीसंख्या 131, उपासनाकांड ओवीसंख्या 140 आणि ज्ञानकांड ओवीसंख्या 245 अशा एकूण 516 ओव्या आहेत. कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड अशी तीन कांडे जणू गीतेचा कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग आहेत. बुवा महाराजांनी 15 वर्षे संप्रदाय चालवला. सांप्रदायिक व सत्शिष्यांशिवाय कुणालाही ग्रंथ उपदेशू नये, अशी महाराजांची स्पष्ट आज्ञा असल्यामुळे ग्रंथ सुरक्षित राहिला. सर्वाप्रत पोहोचला नाही. ‘स्वात्मसौख्य’ ही अतिशय प्रासादिक अशी रचना आहे. एक उदाहरण असे आहे.. दत्तात्रेय गुरूप्रसाद । उपदेश वर लाधला। प्रसादाचा महिमा । सकल व्युत्पत्ती आली आम्हा। अनंत शास्त्रे मनोरमा । ध्यानासी आली ।। ज्ञानकांड ओवीसंख्या 215 व 216. यावरून महाराजांना श्री दत्रात्रेयाचा उपदेश होऊन स्वात्मसौख्यातील ज्ञान प्राप्त झाले आणि ते त्यांनी सूत्ररूपाने सांगितले असून ‘वदता झालो प्रकट तूज’ म्हणजे ‘क्वचित प्रकट क्वचित गुप्त’ अशाप्रकारे सांगितले आहे. अन्य सांप्रदायिक ग्रंथांप्रमाणे ज्ञानकांडाच्या अखेरच्या बारा ओव्यात ग्रंथाची फलश्रुती सांगितली आहे. ग्रंथाच्या नित्य पारायणाने ऐहिक कामना तर पूर्ण होतीलच पण ‘ज्ञान अबाधित होईजे सिद्ध पुरुषासारखे’ असे आश्वासन दिले आहे. प्रत्येक ग्रंथाची एक शक्ती आणि एक प्रकारची मर्यादादेखील असते. या ग्रंथाला संप्रदायाचे कोंदण प्राप्त झाले होते. ती एक मर्यादा होती. ग्रंथाची भाषा प्रासादिक आहे. हा ग्रंथ प्रकाशित करण्यास बंदी होती. ग्रंथाची हस्तलिखित प्रत करून तो जिज्ञासुंनी वाचावा, असा सांप्रदायिक नियम आहे. महाराजांच्या गादीवरील अधिकारी श्री माधवराव गोडबोले यांनी स्वत: या ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती करून घेऊन अनेक भक्त जिज्ञासुंना पुरवल्या. श्री अप्रबुद्ध यांनी ‘सार्थ श्री स्वात्मसौख्य’ नावाने हा ग्रंथ पुनश्च प्रकाशित केला. ग्रंथात शब्द रुढार्थाऐवजी विशिष्ट अर्थाने प्रयुक्त आहेत. उपनिषदे आणि योगशास्त्रांचे संदर्भ असल्यामुळे अर्थ कळणे सोपे नाही. श्री बुवा महाराजांच्या पद्ममय चरित्रासोबतच धुळे येथील जो.रा. सिटी हायस्कूलमधील सेवानिवृत्त नामांकित शिक्षक मा.मा.उपाख्य काकासाहेब पाठक यांनी पुढील काही ग्रंथ लिहिले- पूर्णानंद स्वामी (लामकानीकर) यांचे ओवीबद्ध चरित्र, संत दर्शन (पद्ममय) अठ्ठावीस संतांचे संक्षिप्त चरित्र, संतदर्शन (गद्यमय) कथा ग्रंथ तीस संतांचे संक्षिप्त चरित्र, श्री गुरुचरित्र : संक्षिप्त कथासार, विद्यारण्य स्वामींच्या पंचदशी ग्रंथाचे ओवीबद्ध सार, श्री सद्गुरू पद्मनाथ स्वामींचे ओवीबद्ध चरित्र. होळ येथे श्री नागू बाबांची समाधी आहे. नेर येथील श्री यशवंतराव हे कर्तबगार पोलीस पाटील हनुमान भक्त होते. त्यांच्या स्मरणार्थ हा यशवंत मारुती आहे. मुल्हेरच्या गादीशी संबंधित श्री सीताराम पोळ हे नाव महत्त्वाचे आहे. महाराज मूळ कोल्हापूरचे असावेत. विरक्त अवस्थेत सद्गुरूनाथांच्या शोधात असताना मुरार उद्धव या सत्पुरुषाचा अनुग्रह घेऊन साधनेसाठी ते पांझरा नदीच्या तटाकी नेर येथे विसावले. उद्धव महाराजांच्या संप्रदायात रामोपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण मूळ पुरुष श्री काशिराम महाराजांना नित्य पूजेसाठी श्रीरामप्रभूंनी राम, सीता, लक्ष्मणाच्या धातूच्या मूर्ती दिल्या होत्या. गुरू आ™ोने श्री पोळ यांनीही श्री रामोपासना आरंभिली. नेर येथे श्रीराम मंदिराची स्थापना केली. त्यांचा विशिष्ट असा शिष्य संप्रदाय होता. त्यांच्या शिष्यांमध्ये चोपडे येथील शुक्ल यजुव्रेदी वत्सगोत्री श्री बापूजी जोशी होते. ते गुरुसेवेसाठी सन 1800 च्या सुमारास नेर येथे आले आणि श्रीरामाच्या मंदिराची गुरुआ™ोनुसार निष्ठापूर्वक पूजाअर्चा करू लागले होते. 1830 च्या जवळपास पोळ महाराजांनी समाधी घेतली. त्यांनी श्रीमद्भागवताच्या नित्यापाठाचे व्रत चालवले होते. भागवताचा अभ्यास हा विशिष्ट आणि अनन्यसाधारण असा आहे. सीताराम महाराजांची नामसाधना अखंडपणे सुरू होती. महाराज एकांतप्रिय होते. या एकांत प्रियतेला प्रभुस्पर्श होता आणि होती आपल्या गुरूपरंपरेची महनीय अशी कीर्ती. महाराज आपल्या आंतरिक साधनेत सदासर्वदा निमगA असत आणि त्यातून मौनमूकपणे उपदेशामृत पाझरत असे.
श्री नृसिंह सरस्वती आणि नेर येथील श्री सीताराम पोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:15 AM