आॅनलाईन लोकमतजामनेर, दि.३० : येथील पांडुरंग गोविंंद महाराज संस्थानतर्फे आयोजित करण्यात आलेला श्रीराम रथोत्सवाचा सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.श्रीराम नवमीच्या दिवसापासुन सुरू झालेल्या कार्यक्रमांची सांगता शुक्रवार ३० रोजी रथोत्सवाने झाली. शहरातील नगारखाना येथून मान्यवरांच्या हस्ते विधीवत पुजन होऊन सकाळी दहा वाजता रथोत्सवाला सुरुवात झाली. सनई-चौघडे, ढोल, ताशे, लेझीमपथक आदी वाद्यवृंद रथाच्या अग्रभागी चालत होते. मुख्य मार्गावरून श्रीराम रथाचे मार्गक्रमण सुरू असतांना रस्त्याच्या दुतर्फा दर्शनासाठी भाविक-भक्तांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. साखरेचे'बत्ताशे'प्रसाद म्हणुन वाटप करण्यात येत होते. श्रीराम रथोत्सवाच्या सेवेसाठी नरेंद्र पाटील, प्रताप पाटील, संभाजी सोनार, दिनेश जोशी, गोटू देशपांडे, दीपक जोशी, विठ्ठल येणे, गोविंदा पांढरे, कडु महाजन यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
जामनेर शहरात श्रीराम रथोत्सव उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 5:25 PM
भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याने जामनेर शहरातील रस्ते फुल्ल
ठळक मुद्देजामनेर शहरातील मुख्यमार्गांवरून निघाला श्रीराम रथप्रसाद म्हणून साखरेचे बत्ताशे वाटपश्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकांनी केली गर्दी