मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : कृषी विस्ताराचे राष्ट्रीय व्यवस्थापन संस्थेने देशभरातील २०० यशस्वी कृषिपूरक उद्योग करणाऱ्या उद्योजकांची यशोगाथा नुकतीच स्मरणिकेत प्रकाशित केली आहे. यात मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे येथील माळरानावर वेगवेगळे तलाव करून मत्स्यबीज उत्पादन करणाºया उच्च शिक्षित तरुण श्यामल जावरे यांची मत्स्यबीज प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. त्यांचे हे मत्स्यबीज उत्पादन प्रकल्प कृषीपूरक उद्योजकांना मार्गदर्शक ठरत आहे.कृषी विस्तार राष्ट्रीय व्यवस्थापन संस्था ही देशातील एक स्वायत्त कृषि शिक्षण संस्था आहे. कृषी अर्थव्यवस्थेमध्ये विस्तार अधिकारी, व्यवस्थापक, शास्त्रज्ञ आणि प्रशासक यांना व्यवस्थापकीय आणि तांत्रिक कौशल्यांचा विकास करणे, शेतकऱ्यांंना आणि मच्छीमारांना टिकाऊ शेतीचा सराव करण्यासाठी त्यांना सहाय्य आणि सेवा प्रदान करण्यात सक्षम करणे हा आहे. अशा या संस्थेमार्फत मुक्ताईनगरसारख्या ग्रामीण भागातील मत्स्यबीज उत्पादन करणाºया शेतकºयाचा यशोगाथा मांडून सन्मानित करण्यात आले आहेमुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे गावाच्या माळरानावर असलेल्या आपल्या पडीक सहा एकर क्षेत्रात उच्चशिक्षित तरुण शेतकºयांचे मत्स्यबीज उत्पादन प्रकल्प साकारला आहे. त्यातून शेती पूरक उद्योगांच्या नावीन्यपूर्ण उपक्रम तयार झालाय. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेल्या या प्रकल्पातून पहिल्या पंधरवड्यात २५ लाख मत्स्यबीज उत्पादन घेण्याचा विक्रम केला आहे.असा आहे प्रकल्पसव्वा कोटी रुपये खर्चातूून श्यामल जावरे यांनी आधुनिक प्रकल्प उभा केला आहे. खासगी स्वरूपात खान्देशातून हा पहिलाच प्रकल्प आहे. प्रकल्पात ब्रूडर टँकमध्ये दोन हॉर्सपॉवरच्या मोटर चालणारे दोन एरिएटर सोडले आहेत. त्यामुळे पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण वाढून पाण्याचा प्रवाह पोहण्याचा व्यायाम मिळतो. येथील मासे आठ मीटर व्यासाच्या स्पनिग पुलांमध्ये सोडले जातात. येथे नर व मादी सोडून अंडी फलित होतात. तयार झालेल्या अंडी सोडले जातात. ७२ तासांनंतर अंड्यांमधून मत्स्यबीज तयार होतात. हे पाईपलाईनद्वारे स्क्रीनिंग पूलमध्ये सोडले जातात. तेथे माश्यांवर कंडिशनिंग शावर केले जाते. हे बीजखाद्य ग्रहण करण्यायोग्य झाल्यानंतर त्यांना नर्सरी मध्ये सोडले जाते. थोडक्यात या संपूर्ण प्रक्रियेत येथे आठ तलाव तयार करण्यात आले आहे. प्रकल्पाची रचनेट प्रकल्पात पावसाचे पाणी येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.मिरगड रोहू कटलाप्रजाती खान्देशात मासेमारी व्यवसाय करणाºया संस्था व व्यावसायिक मिरगळ रोह कतला असे मत्स्यबीज वापर करतात. हे बीज त्यांना कोलकाता किंवा हैदराबाद येथून मागवायचे लागते. त्यांनी या तिन्ही प्रकारच्या मत्स्यबीजांचे उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे व्यावसायिकांना लांब अंतरावरून मत्स्यबीज आणण्याचा खर्च आणि त्रास टळला आहे.उच्च शिक्षित तरुणसेवानिवृत्त अधिकारी महेंद्र रामकृष्ण भोई यांचे पुत्र श्यामल जावरे यांनी हा प्रकल्प साकारला आहे. बीएससी अॅग्री मास्टर आॅफ मार्केटिंग मॅनेजमेंट अशा उच्च शिक्षणाची नोकरी सोडून त्यांनी शेतीची कास धरली. मत्स्यबीज उत्पादन करणारे व्यवसाय निवडला. यासाठी त्यांनी सेंटर इन्स्टिट्यूट आॅफ एज्युकेशन अभ्यास केला. नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला आणि तो यशस्वी ठरला. देशपातळीवर यशस्वी मत्स्यबीज उत्पादक म्हणून ते ओळखले जाऊ लागले आहेत.
देशातील २०० यशस्वी कृषी उद्योजकात मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे येथील श्यामल जावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 6:27 PM
कृषी विस्ताराचे राष्ट्रीय व्यवस्थापन संस्थेने देशभरातील २०० यशस्वी कृषिपूरक उद्योग करणाऱ्या उद्योजकांची यशोगाथा नुकतीच स्मरणिकेत प्रकाशित केली आहे. यात मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे येथील माळरानावर वेगवेगळे तलाव करून मत्स्यबीज उत्पादन करणाºया उच्च शिक्षित तरुण श्यामल जावरे यांची मत्स्यबीज प्रकल्पाची निवड करण्यात आली
ठळक मुद्देपडीक जमिनीतून साकारला प्रकल्पनोकरी सोडून सुरू केला व्यवसाय