जळगाव : पिंप्राळा परिसरातील सिल्क मीलनजीकच्या सिद्धीविनायक कॉलनीत घर बंद असल्याची संधी साधत चोरटय़ांनी सचिन रामेश्वर डगवाल यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एका खासगी कंपनीत एरिया मॅनेजर म्हणून नोकरीस असलेले डगवाल हे सिध्दी विनायक कॉलनीतील सिल्क मीलजवळ चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या घरात वडील रामेश्वर रतनसा डगवाल, आई रेखा, प}ी मोनाली व दोन मुलींसह भाडय़ाने राहतात. 1 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता ते कुटूंबासह नागपूरला जाण्यासाठी निघाले. रस्त्यात वाशिम येथे आई व वडीलांना सोडून डगवाल प}ीसह पुढे रवाना झाले. 6 जानेवारी रोजी रात्री दहा वाजता नागपूर येथून घरी आले असता घराबाहेरील कंपाऊडला कुलूप लावलेले होते. असा गेला मुद्देमाल66 हजार रुपये किमतीचे 3 तोळ्याच्या 4 सोन्याच्या अंगठय़ा33 हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे नेकलेस12 हजार 100 रुपये किमतीची साडे पाच ग्रॅमची कानातील रिंग6 हजार 600 रुपये किमतीचे 3 ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट4 हजार 400 रुपये किमतीचे 2 ग्रॅम वजनाची अंगठी3 हजार 300 रुपये किमतीचे दीड ग्रॅम सोन्याचे ओम पान3 हजार 300 रुपये किमतीची दीड ग्रॅम सोन्याची नथ2 हजार 200 रुपये किमतीचे सोन्याचे मणी व मुरण्या3 हजार रुपये किमतीचे जोडवे, पैंजन, ग्लास आदी साहित्य3 हजार रुपये रोख एकूण : 1 लाख 36 हजार 900 रुपयांचा ऐवज
सिध्दी विनायक कॉलनीत घरफोडी
By admin | Published: January 08, 2017 12:48 AM