पर्यटकांची रेलचेल असते. मात्र आता या ठिकाणी येणे म्हणजे कसरत होत असल्याने त्याचा परिणाम पर्यटनावरही झाला आहे. खराब रस्त्यांमुळे पर्यटकांची मोठी नाराजी असून, याचा थेट परिणाम या ठिकाणच्या पर्यटनावर झाला आहे.
सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या पाल या गावास पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाला आहे. येथील एकेकाळी असलेले घनदाट जंगल, आदिवासींच्या परंपरांचे देखावे, उंचच उंच पर्वतरांगा, नदी, वनोद्यान यासारख्या अनेक बाबी या ठिकाणी पर्यटकांना आजही खुणावतात. दूरहून पर्यटक या ठिकाणी येत असतात. मात्र गेल्या काही काळापासून या वैभवाला रस्त्यांची
दृष्ट लागली आहे.
रस्त्याची दुरवस्था
रावेर-पाल रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. केवळ २४ किलोमीटर अंतर पार करायला एक ते दीड तास लागतो. खड्ड्यांमध्ये आदळून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे पर्यटकांची रेलचेल कमी झाली आहे.
रावेर-पाल रस्ता तालुक्याला जोडला असल्याने परिसरातील शेतकरी, व्यापारी, नोकर वर्ग, पर्यटक याच मार्गाने ये-जा करत असतात. शेतीतील साहित्य, रासायनिक खते, भाजीपाला, किराणा आणण्यासाठी येथील नागरिकांना कसरत करावी लागत आहे. अनेकवेळा वाहनाचे नुकसान होत आहे.
लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास येथील पर्यटन तसेच त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायांवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.