जि.प.शाळेतील खाजगी शाळेवर सीईओंचे कारवाईचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:32 PM
ठरावानुसार जि.प.ची मराठी शाळा दरमहा 1700 रुपये प्रमाणे वर्षाला 20 हजार 400 प्रमाणे भाडय़ाने देण्यात आली होती़
ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 20 - चोपडा तालुक्यातील धानोरा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत चक्क दोन वर्षापासून खाजगी इंग्लिश मीडियमची शाळा सुरु असल्याबाबत शिक्षण व्यवस्थापन समितीच्या सदस्य प्रतिभा ज्ञानेश्वर सोनवणे यांनी तक्रार केली होती़ या तक्रारीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चार सदस्यांची समिती नेमून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून कारवाईचे संकेत दिले आहेत़चोपडा तालुक्यातील धानोरा येथे जि.प.च्या मराठी शाळेत गेल्या दोन वषार्पासून एका खाजगी संस्था चालकांकडून इंग्लिश मीडियमची शाळा उघडपणे सुरू होती. मुख्याध्यापक व शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष यांच्या ठरावानुसार जि.प.ची मराठी शाळा दरमहा 1700 रुपये प्रमाणे वर्षाला 20 हजार 400 प्रमाणे भाडय़ाने देण्यात आली होती़ यात मुख्याध्यापक तसेच खाजगी शाळेतील शिक्षक तसेच राजकीय पुढा:यांच्या संगनमताने शासनाची फसवणूक करण्यात येत होती़ मात्र या प्रकाराकडे जि.प. शिक्षण विभाग व गावातील नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात होते. जि.प. शाळेतील विद्याथ्र्याचे मात्र या ठिकाणी हाल होत होते.याबाबत शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीच्या सदस्य प्रतिभा सोनवणे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, शिक्षणाधिकारी तसेच जि.प.शिक्षण सभापती यांच्याकडे तक्रार केली होती़