ऑनलाईन लोकमत
भुसावळ, जि. जळगाव, दि. 25 - : ब्लॉकच्या काळात पुष्पक एक्स्प्रेसला सिगAल देण्यात आला. यात दोषी आढळलून आलेल्या ब:हाणपूर रेल्वे स्थानकाच्या कॅबीनवरील महिला सहाय्यक स्थानक व्यवस्थापक (डीवायएसएस) अर्चना सिन्हा यांना रेल्वेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले. ही कारवाई येथील स्थानिक रेल्वे प्रशासनाने गुरुवारी अतिशय गोपनीय पद्धतीने केली. दरम्यान, या कारवाईला भुसावळचे डीआरएम आर. के. यादव यांनी दुजोरा दिला आहे. या कारवाईने रेल्वे कर्मचा:यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.याबाबत अधिकृत रेल्वे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज गुरुवारी वाघोड-ब:हाणपूर दरम्यान, तांत्रिक कामांसाठी अभियांत्रिकी विभागाचा दीड तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. ब्लॉक सुरू असताना याच काळात दुपारी 1.21 वाजेच्या सुमारास 15334 लखनौ-एलटीटी पुष्पक एक्स्प्रेसला थांबविण्या ऐवजी तिला पुढे जाण्यासाठी ब:हाणपूर स्थानकावरील कॅबीनवरील महिला सहाय्यक स्थानक व्यवस्थापक अर्चना सिन्हा यांनी सिगAल दिला.पवार धावलेदरम्यान, याच स्थानकावरील दुसरे एक सहाय्यक स्थानक व्यवस्थापक एस.के.पवार डय़ुटीला होते.ब्लॉक सुरू असताना पुष्पक या जलद एक्स्प्रेसला सिगAल देण्यात आल्याची बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सिगAल रेड केला.त्यामुळे पुढील अनर्थ टळला. अन्यथा मोठी हानी झाली असती,असे सूत्र म्हणाले. एस.के.पवार यांनी अतीशय चांगले काम केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान रेल्वेने त्यांच्याकडून नेमके काय घडले याबाबत खुलासा (से) मागितला आहे.निलंबनाची कारवाईअर्चना सिन्हा यांना तातडीने सेवेतून बडतर्फ करण्यात आले.याच ठिकाणच्या आणखी काही कर्मचा:यांवर कारवाईची शक्यता आहे. प्रकरण गोपनीय असल्याने त्यांची नावे समजू शकली नाहीत.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू असल्याचे सूत्र म्हणाले.ब्लॉक सुरू असताना गाडीला सिग्नल मिळाल्याचे पुष्पक एक्स्प्रेसचे चालक यांच्याही लक्षात आले त्यामुळे त्यांनीही सर्तकता बाळगली.लागोपाठ झालेल्या अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारुन रेल्वे मंडळाचे चेअरमन ए.के.मित्तल यांनी राजिनामा दिला. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनीही राजिनाम्याचा प्रस्ताव दिला.अशीच अप्रिय घटना भुसावळ विभागात घडली असतीतर जबाबदार कोण या पाश्र्वभूमीवर प्राथमिक चौकशीत दोषी आढळून आल्याने अर्चना यांना सेवेतून टर्मिनेट करण्यात आले.सूत्रांनी सांगितले की, पुष्पकला सिगAला मिळाला मात्र ती गाडी ब्लॉक एरियात शिरण्याआधीच पवार यांनी ती रोखली.त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.